Headlines

सोनाली फोगाट PA सोबत २ तास बाथरूम मध्ये…मृत्यूचं खळबळजनक कारण अखेर समोर

[ad_1]

Sonali Phogat Death : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचा  हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात (goa) मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. शवविच्छेदनानंतर सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोनाली फोगट यांच्या भावाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर याप्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोनाली फोगट यांचे पीए आणि सुधीर सांगवान आणि त्यांचा मित्र सुखविंदरवर गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.टिकटॉक स्टार, अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंग यांना ताब्यात घेतलंय.मुख्य मुद्दा असा, की सोनाली यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची तक्रार गोवा पोलिसांनी दाखल केली. शवविच्छेदन अहवालानंतर सोनाली यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या. मात्र, अंतर्गत अवयवांना जखमा जास्त झाल्याची माहिती समोर आली. यावरून सोनाली यांच्यासोबत हाणामारी झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी सोनाली फोगट यांना काही विषारी द्रव्य दिल्याचाही संशय बळावला.

पणजीचे पोलीस निरीक्षकांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही महत्वाची माहिती समोर आणली आहे. त्यांच्या माहितीनुसार जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात दोघेजण सोनालीला जबरदस्ती काहीतरी ड्रिंक पाजत होते. 

त्यांनतर दोघांनी तिला बाथरूम मध्ये नेलं आणि दोन तास ते बाथरूम मधेच होते दरम्यान बाथरूम मध्ये तिला काही इंज्युरी झाली असावी असं सांगण्यात येतंय तर सिंथेटिक ड्रग दिल्यामुळेच तिचा मृत्यू झालायचं तपासात समोर आलं आहे.

सोनाली च्या मृत्यूमागे हार्ट अटॅक  कारण नाहीये हे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता सोनाली फोगटच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे .

सोनाली यांचा भाऊ, रिंकू ढाकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बहाण्यानं गोव्यात आणलं गेलं. पण, इथं कोणतंही चित्रीकरण होणार नव्हतं.

कुटुंबाला हे चित्रीकरण 24 ऑगस्टला होणार होतं, पण हॉटेल मात्र 21-22 ऑगस्टसाठीच बुक करण्यात आल्याची माहिती असल्याचंही त्यानं दिली. (actress tunred bjp leader Sonali phogat death controversy details big news)

गोव्यात येण्याचा तिचा कोणताच बेत नव्हता. पूर्वनियोजीत आराखड्यानुसार तिला इथं आणलं गेलं. तिथं कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण होणार नव्हतं. हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी फक्त दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या’, असं रिंकूनं सांगितलं. 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *