Headlines

“शरद पवार सोबत असल्यानंतर…”; ‘वादळं निर्माण करणारे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं विधान; ‘लढाईच्या क्षणा’बद्दलही बोलले | uddhav thackeray praises NCP Chief Sharad Pawar scsg 91

[ad_1]

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच २०१९ मधील शरद पवारांच्या पावसातील भाषणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं.

नक्की वाचा >> शिंदे, फडणवीस, नार्वेकर एकाच मंचावर; बैठकीला उपस्थित असलेले सरनाईक म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत…”

भुजबळांचा उल्लेख वादळ असा केल्याचा संदर्भ देत उद्धव यांनी, “अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्या वेळेस अशी अनेक वादळं सोबत सुद्धा होती,” असं शिवसेनेच्या जुन्या दिवसांसंदर्भात विधान केलं. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दलही उद्धव यांनी सूचक विधान केलं. “आताच्या या वादळामध्ये राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ही मंचावरील मोठी मोठी वादळं सोबत आहेतच. इथं शरद पवारसाहेब आहेत. वादळ निर्माण करणारे. हे सोबत असल्यानंतर वादळ असो पाऊस असो ते न डगमगता उभे राहतात,” असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाविरुद्ध सुरु असणाऱ्या संघर्षाच्या संदर्भातून उद्धव यांनी, “त्यामुळे एवढ्या सगळ्यांची सोबत असल्याने मी लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय,” असंही म्हटलं. भाषणाच्या शेवटाकडे उद्धव यांनी, “असो मी जास्त बोलत नाही नाहीतर भुजबळसाहेब म्हणतील कौतुक माझं आहे की तुझं आहे,” असं म्हणताच सारेजण हसू लागले. उद्धव यांच्या नावाने घोषणाबाजी झाल्यानंतर ‘आगे बढो’ म्हणतायत तसं पाठीशीही राहा असं सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

नक्की वाचा >> “आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात…”; सेनेतील फुटीनंतरच्या पहिल्याच भेटीत फारुख अब्दुल्लांनी उद्धव ठाकरेंना दिला धीर

तसेच मैदानावरुन झालेल्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट राजकारणावरुन सूचक विधान करताना उद्धव यांनी, “हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे,” असंही म्हटलं. उद्धव यांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून त्यांचं समर्थन केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *