Headlines

शरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण…; मराठमोळा अभिनेता ‘या’ एका प्रश्नाने हैराण

[ad_1]

Sharad Kelkar : आपल्या दमदार आवाजासाठी आणि अभिनयासाठी संपूर्ण भारतीयांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शरद केळकर हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्यानं आजवर मुख्य भूमिका म्हणजेच लीड रोल साकारला नाही. पण सह-कलाकाराची भूमिका साकारत अनेकदा तो लीड कलाकारांवर भारी पडला आहे. दरम्यान, आता तो काम मागतोय. नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

शरद केळकरणं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला मोठ्या पडद्यावर खूप वेळ असणाऱ्या किंवा लीड रोल अशा भूमिका मिळत नाही. याविषयी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. शदरनं ही मुलाखत ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. “मला ज्या भूमिका मिळाल्या आहेत, त्यासाठी मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो. असे अनेक कलाकार आहेत, जे माझ्यापेक्षा चांगले असतील किंवा माझ्याहून चांगलं काम करु शकतात. पण अनेकदा नशिब पण महत्त्वाचं असतं. मी भाग्यवान आहे की मला त्या भूमिका मिळाल्या. पण तुलना करायची झाली तर त्या भूमिका जास्त काळाच्या नव्हत्या. मला हे कळतं नाही की इंडस्ट्री ही गोष्ट का समजून घेत नाही. मला खरंच कळतं नाही की, मला मोठ्या आणि जास्त काळ स्क्रिनवर असणाऱ्या भूमिकांसाठी कास्ट करण्यापासून त्यांना काय थांबवतंय. असं असू शकतं की बिझनेसविषयी इतरांमध्ये माझ्यापेक्षा जास्त समज आहे. मला या मागचं कारण माहित नाही”, असं शरद म्हणाला.

शरद पुढे म्हणाला, “मी एक पॉजिटिव्ह व्यक्ती आहे. मी फक्त या गोष्टीची प्रतिक्षा करतो की मला कधी संधी मिळेल. मी हे बोलत नाही की मी खूप चांगला अभिनेता आहे, पण मी खूप मेहनती आहे आणि स्वत: वर विश्वास ठेवतो. मी कधीच हार मानत नाही आणि माझा हाच अॅटिट्यूड असतो. मी फक्त या दिवसाची प्रतिक्षा करतोय जेव्हा लोकं माझ्यावर विश्वास करतील.” 

हेही वाचा : जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली ‘ही’ गोष्ट…

दरम्यान, त्याला या गोष्टीचं समाधान आहे की त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. शरद म्हणाला, “मला एकाच गोष्टीची चिंता असते की मी अशा भूमिका करण्यासाठी सक्षम आहे? तुम्हाला  स्वत: ला हे समजायला हवं. तुम्ही तुमचं काम करतात आणि जर लोक त्याची स्तुती करतात, तर त्यातून तुम्हाला आणखी एक अशी आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रेरणा मिळते. मी तशाच भूमिका स्विकारतो देखील.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *