Headlines

‘…अन्यथा नाटक तिथेच अडकून राहिले असते’, भार्गवी चिरमुलेने प्रयोगानंतर मागितली माफी

[ad_1]

Bhargavi Chirmule Apologize : मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भार्गवी चिरमुलेला ओळखले जाते. भार्गवीने मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या भार्गवी ही ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात व्यस्त आहे. आता भार्गवीने या नाटकादरम्यान घडलेली एक गंमतीशीर गोष्ट सांगितली आहे. भार्गवीनं नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रेक्षकांबरोबर ही गोष्ट शेअर केली आहे.

झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान भार्गवी चिरमुलेने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “नाटक म्हटल्यावर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच असते. पण ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत. सध्या माझं ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक सुरु आहे. हे कॉमेडी नाटक आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना खूप अलर्ट राहावं लागतं. त्यात पंच लाइन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो. त्यामुळे अनेक गोष्टी सांभाळत आम्हाला नाटक करावं लागतं.”

भार्गवीने सांगितला प्रयोगावेळी घडलेला किस्सा

पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात कधी ना कधी असा एक क्षण येतो, जेव्हा आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ झालेलो असतो. आपल्याला त्यावेळी पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नसते. आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते. त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ असे म्हणतो. परवा झालेला एका प्रयोगावेळी हेच झालं होतं. मी स्टेजवर पूर्णपणे ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ झाले आणि ते इतर कलाकारांप्रमाणे माझ्याही डोळ्यात दिसते. यावेळी समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल, तर त्याला हे लगेच कळतं. वैभव मांगलेला देखील हे कळलं होतं की, मला काहीच आठवत नाही. वैभवने, माझ्याकडे बघून काय? असं विचारलं. तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते. आमचे नाटक कॉमेडी असल्याने एकावर एक अशी वाक्ये होती. त्यामुळे माझी वाक्ये तो घेऊ शकत नव्हता आणि ती घेतल्याशिवाय नाटकात पुढे जाताच येत नव्हते. 

वैभव या नाटकात निमिष कुलकर्णी साकारत आहे आणि मी विसरली आहे, हे त्याला समजलं नव्हतं. कारण तो माझ्याकडे पाठमोरा उभा होता. त्यावेळी तो वाक्य का येत नाही, याची वाट पाहत होता. तर दुसरीकडे मी वाक्य काय आहे, वाक्य काय आहे, याचा विचार करत होते. एका पॉईंटला वैभवने माझ्याकडे डोळे मोठे करून वाक्य असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली. मला ते वाक्य आठवलं, मी ते वाक्य बोलले आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं, असा किस्सा भार्गवीने यावेळी सांगितला. 

मनापासून रंगदेवतेची मागितली माफी

यापुढे ती म्हणाली, मी त्या दिवशी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली. माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर. पण, पुन्हा कधी माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये. पण जेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही, असं दाखवतो. या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत. 

दरम्यान, भार्गवी चिरमुले आणि वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलेले ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक सध्या दणक्यात सुरु आहे. या नाटकाचे प्रयोग नाशिक, पुणे, चिंचवड, बोरिवली, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, वाशी, पार्ले या ठिकाणी होणार आहेत. या नाटकात वैभव आमि भार्गवीसोबतच सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी, विकास चव्हाण हे कलाकारही झळकत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *