Headlines

स्वत:च्या इच्छेनं नव्हे, तर… ; आजपर्यंत अविवाहित का? या प्रश्नावर Salman Khan चा मोठा उलगडा

[ad_1]

Salman Khan Marriage : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमाननं त्याच्या आयुष्यात अनेक मुलींना डेट केलं. 57 वर्षीय सलमानच्या प्रेमात आजही अनेक मुली वेड्या आहेत. मात्र, तरीही सलमान सेटल होऊ शकला नाही. सलमानच्या लव्ह लाईफमध्ये जेवढे ट्विस्ट आणि टर्न आले तेवढे क्वचित कोणाच्या आयुष्यात आले असतील. मात्र, आता भाईजान लग्न करणार नाही का? हा प्रश्न कायम आहे. कारण आजही सलमान लग्न कधी करणार? असा प्रश्न आहेच. पण एकीकडे लग्न न करता राहणं सलमानला आवडत नाही, हे त्याच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यातून समोर येत आहे. तो इतकी वर्षे एकटा का राहिला त्याचा खुलासा त्यानं केला आहे. 

काल रात्री ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या रिअॅलिटी शोटा ग्रँड फिनाले झाला. यावेळी टॉप 5 स्पर्धकांमधली शालीन भानोटा (Shalin Bhanot) शोमधून बाहेर आला आणि सलमाननं त्याच्यासोबत खूप मस्ती केली. यावेळी मस्ती करत शालीन म्हणाला की त्याला सलमान खानकडून काही तरी शिकायला मिळालं आहे. शालीन म्हणाला की तो आता सलमानसारखं एकटा राहण्याचा विचार करत आहे. यावेळी शालीनला सलमान असं काही म्हणाला की त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की ज्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की सलमानला कदाचित आयुष्यात सेटल व्हायचे आहे. सलमान म्हणाला, ‘मी माझ्या इच्छेनं सिंगल नाही.’

सलमान खाननं बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्यामध्ये अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) , कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), यूलिया वंतूरसारख्या (Iulia Vantur) अनेक कलाकारांची नावं होती. 

हेही वाचा : Shahid Kapoor आणि ‘या’ अभिनेत्रीच्या मैत्रीमुळे, पत्नी Mira Rajput झाली होती इनसिक्योर!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की सलमान बोहल्यावर चढणार आहे. सलमान जिच्यासोबत लग्न करत असल्याच्या चर्चा आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कपूर घराण्याची लाडकी लेक आहे. तीच नाव आहे करिष्मा कपूर. बॉलिवूडमध्ये करिष्मा कपूरने (Karishma Kapoor) 17 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. सौंदर्य आणि उत्तम अभिनय त्यासोबत नृत्यशैलीच्या जोरावर करिष्माने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. मात्र, खाजगी आयुष्यात तिची गणितं चुकली आणि ती नवऱ्यापासून विभक्त झाली.तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर करिश्मा कपूर बराच काळ सिंगल राहिली. मात्र आता करिष्मा mingle होऊ शकते.

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्याचे थिएटरमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *