Headlines

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

[ad_1]

Womens Ipl Auction 2023 : ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा ‘महिला आयपीएल’ म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द केले आणि पाच संघांच्या महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. WPL 2023 लिलावासाठी निवडलेल्या 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आहेत. आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी आहेत. (womens ipl auction 2023 wpl auction players base price telecast live streaming time Every update smriti mandhana Harmanpreet Kaur players These players can become rich)

दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने ऑक्शनसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटर्सचा लीलाव मग ऑक्शनरच्या भूमिकेदेखील क्रिकेट प्रेमींना महिला दिसून येणार आहे. आजच्या लिलावात भारताच्या स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौरपासून ते ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी, अ‍ॅलिसा हीली आणि न्यूझीलंडच्या अमेलिया कारपर्यंतच्या खेळाडूंना मोठ्या बोली लावली जाण्याची शक्यता आहे. मंधाना, हरमनप्रीतसोबत ‘या’ 10 महिला क्रिकेटपटू आज करोडपती बनू शकतात. जाणून घ्या या लिलावाबद्दल प्रत्येक अपडेट…

लिलावात सहभागी होणारे पाच संघ (How many teams are participating)

मुंबई इंडियन्स महिला संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ
गुजरात जायंट्स 
यूपी वॉरियर्स

महिला प्रीमियर लीग 2023 कधी आहे? (When will the Women’s Premier League 2023 auction be held)

महिला प्रीमियर लीग 2023 – 22 सामन्यांची स्पर्धा 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहेत.

महिला प्रीमियर लीग 2023 लिलाव किती वाजता होणार? (When, where and from what time)

महिला प्रीमियर लीग 2023 लिलाव आज दुपारी 2:30 वाजता सुरु होणार आहे. WPL लिलाव 2023 मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

लिलावासाठी किती खेळाडूंची निवड? (How many players were shortlisted)

महिला प्रीमियर लीग 2023 लिलावासाठी 1525 महिला क्रिकेटपटूंनी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 409 महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 

लिलावात किती खेळाडू विकले जाऊ शकतात? (How many players can be sold)

महिला प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात जास्तीत जास्त 90 खेळाडू (60 भारतीय आणि 30 परदेशी) विकले जाऊ शकतात. पाच संघांमध्ये एकूण 90 जागा रिक्त आहेत.

एका संघात किती खेळाडू असतील?  (How many players will be there in one team)

संघाने किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करणे आवश्यक आहे. सर्व संघ जास्तीत जास्त सहा परदेशी खेळाडू खरेदी करू शकतात. महिला प्रीमियर लीग 2023 मध्ये जास्तीत जास्त 30 विदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतील.

लिलावासाठी संघाकडे किती पैसे असतील? (How much money will a team have)

महिला प्रीमियर लीग लिलावात एका संघाकडे जास्तीत जास्त 12 कोटी रुपय असतील. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांची मूळ किंमत 30 लाख रुपये किंवा 40 लाख रुपये किंवा 50 लाख रुपये निवडण्याचा पर्याय होता. तर, अनकॅप्ड खेळाडूंची मूळ किंमत 10 लाख आणि 20 लाख रुपये होती.

भारताच्या या खेळाडूंची निवड (Indian Players)

 हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, रिचा घोष, स्नेह राणा आणि मेघना सिंग यांच्यावर लिलावामध्ये बोली लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंची निवड (players from Australia)

अॅशले गार्डनर, एलिस पेरी, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली, जेस जोनासेन आणि डार्सी ब्राउन

इंग्लंडच्या या खेळाडूंची निवड (players from England)

सोफी एक्लेस्टोन, नॅट सायव्हर, डॅनियल यॉट आणि कॅथरीन सायव्हर.

महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 लिलाव कुठे पाहू शकता? (Where can I watch )

स्पोर्ट्स 18 वाहिनीद्वारे महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चा लिलाव टीव्हीवर दाखवला जाणार आहे. 2023 WPL लिलाव Jio Cinema वेबसाइट आणि ऍप्लिकेशनवर ऑनलाइनवर LIVE पाहता येणार आहे. 

या खेळाडूंवर नजर (the top base price list)

स्मृती मानधना 

भारताची स्फोटक सलामीवीर स्मृती मानधना वेगवान फलंदाजी करत आहे. मंधानाला संघाचा कर्णधारही बनवता येईल. भारतासाठी 112 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्मृतीने 123.13 च्या स्ट्राइक रेटने 2651 धावा केल्या आहेत.

मंधानाचा मार्की खेळाडूंच्या सेट-1 मध्ये समावेश आहे. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. 

हरमनप्रीत कौर

महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही देखील स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. तिने 2020 T20 विश्वचषक आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत संघाला अंतिम फेरीत नेले.  हरमनप्रीत कौरची मार्की खेळाडूंच्या सेट-1 मध्ये समावेश आहे. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. 

शेफाली वर्मा 

टीम इंडियाला चॅम्पियन बनवणारी कर्णधार शेफाली वर्मालाही WPL लिलावात मोठी बोली लागू शकते. शेफाली स्फोटक फलंदाजीही करते. भारतासाठी आतापर्यंत 51 सामन्यांत त्याने 134.53 च्या स्ट्राईक रेटने 1231 धावा केल्या आहेत. फलंदाजांच्या सेट-1 मध्ये शेफालीचा समावेश आहे. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. 

ऋचा घोष 

फलंदाज रिचा घोषही करोडपती होऊ शकते. यष्टिरक्षणासोबतच ऋचामध्ये लांबलचक षटकार मारण्याचीही क्षमता आहे. भारतासाठी खेळलेल्या 30 सामन्यांमध्ये त्याने 134.27 च्या स्ट्राइक रेटने 427 धावा केल्या आहेत. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये आहेत. 

दीप्ती शर्मा 

दीप्ती शर्मा दीर्घकाळ भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ऑफ-स्पिन गोलंदाजीसोबतच दीप्ती खालच्या क्रमाने फलंदाजीही करते. भारतासाठी 87 सामन्यांमध्ये दीप्तीने 914 धावा केल्या आहेत आणि 96 विकेट घेतल्या आहेत. मार्की खेळाडूंच्या सेट-2 मध्ये दीप्तीचा समावेश आहे. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. 

एलिस पेरी 

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी ही सर्वात अनुभवी महिला खेळाडूंपैकी एक आहे. 2009 पासून तो ऑस्ट्रेलियासाठी सर्व T20 विश्वचषक खेळली आहे. आतापर्यंत 134 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 1515 धावा केल्या आहेत आणि 120 विकेट्स घेतल्या आहेत. पेरी मार्की खेळाडूंच्या सेट-1 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये आहेत.

अमेलिया केर

न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर फलंदाजीबरोबरच लेग-स्पिन गोलंदाजी करते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे द्विशतक आहे. याशिवाय त्याने 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 565 धावा केल्या आहेत आणि 55 बळीही घेतले आहेत. अमेलिया मार्की प्लेयर्सच्या सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 40 लाख रुपये आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *