Headlines

पहिला पती मद्यपान करत मारायचा, दुसऱ्याचे लेकीसोबत गैरवर्तन आणि…; असं होतं Shweta Tiwari चं वैवाहिक आयुष्य

[ad_1]

Shweta Tiwari’s Married Life : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता आणि पलकला एकत्र पाहिलं की पलक ही श्वेताची लेक नाही तर लहान बहिण वाटते. श्वेतानं आता पर्यंत तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये खूप यश मिळवलं, पण खासगी आयुष्यात तिला इतकं यश मिळालं नाही. आज आपण श्वेताच्या अयशस्वी विवाहांबद्दल जाणून घेणार आहोत. 

श्वेता तिवारीचं पहिलं लग्न आधी राजा चौधरीसोबत झालं. श्वेताचं हे लग्न 1998 मध्ये झालं होतं आणि या लग्नातून श्वेताची मुलगी पलकचा जन्म झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर श्वेताच्या आयुष्यात चढ-उतार सुरु झाले होते. श्वेतानं एक खुलासा केला होता की दारूच्या नशेत राजा चौधरी तिच्याशी भांडायचा. या शिवाय तो लेक पलकला देखील मारायचा. त्यानंतर राजा चौधरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्या व्हिडीओमध्ये तो मद्यपान करून धिंगाणा घालताना दिसला. त्यानंतर 2007 मध्ये राजा आणि श्वेता यांचा घटस्फोट झाला होता. 

पहिले लग्न मोडल्यानंतर श्वेता तिवारीनं 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. मात्र, श्वेताचं हे लग्न देखील अयशस्वी ठरलं. या लग्नातून श्वेताला मुलगा रेयांश झाला. दरम्यान, श्वेता रेयांशशी अभिनवला भेटू देत नाही असे सांगत खळबळ उडवली होती. तर अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबत असेही म्हटले होते की अभिनव श्वेताची मुलगी पलकसोबत गैरवर्तन करायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. 

दरम्यान, एका मुलाखतीत श्वेतानं खुलासा केला की तिचा लग्नावर विश्वास नाही. एवढंच काय तर तिनं लेक पलकला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे.  श्वेतानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘हे माझ्या मुलीचे आयुष्य आहे आणि तिला ते कसे जगायचे आहे हे मी ठरवत नाही. पण तिनं कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करावा असं मला वाटतं. फक्त तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, असं काही नाही. त्या रिलेशनशिपनंतर लग्न करणे आवश्यक आहे. आयुष्यात लग्न होणं खूप महत्वाचे आहे आणि लग्नाशिवाय आयुष्य कसे जाईल, असे होऊ नये.’ 

हेही वाचा : ‘आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट…’, Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

पुढे श्वेता म्हणाली, ‘मला सांगायचं आहे की प्रत्येक लग्न वाईट नसतं. माझे अनेक मित्र आहेत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी असे अनेक मित्र पाहिलेत जे त्यांच्या वैवाहीक आयुष्यात कॉम्प्रोमाइज करतात. जे योग्य नाही. ते त्यांच्यां मुलांसाठी योग्य नाही.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *