Headlines

रजनीकांत यांची संपत्ती एकाच रात्रीत 100 कोटींनी वाढली; ठरले देशातील सर्वात महागडे अभिनेते

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जेलर चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. जेलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून, 600 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट अद्यापही अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरु असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. तब्बल दोन वर्षांनी रजनीकांत यांना जेलर चित्रपटाच्या निमित्ताने यश चाखण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान जेलरच्या यशामुळे निर्माते मालामाल झाले असताना, रजनीकांत यांच्याही संपत्तीत  तब्बल 100 कोटींची वाढ झाली आहे. 

सन पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसचे मालक कलानिथी मारन यांनी नुकतीच रजनीकांत यांची भेट घेतली. चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी रजनीकांत यांना 100 कोटींचा चेक दिला आहे. जेलर चित्रपटाला झालेल्या नफ्यातील हा भाग आहे. इतकंच नाही तर यावेळी रजनीकांत यांनी BMW X7 ही भेट म्हणून देण्यात आली. कलानिथी यांनी ट्विटला याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मनोबाला यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, “अशी माहिती मिळत आहे की, कलानिथी मारन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेल्या लिफाफ्यात सिटी युनियन बँकेचा 100 कोटी रुपयांचा धनादेश आहे. हा जेलरचा नफा शेअरिंग चेक आहे. दरम्यान याआधी चित्रपटासाठी रजनीकांत यांना 110 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. म्हणजेच रजनीकांत यांना जेलर चित्रपटासाठी 210 कोटी रुपये मिळाले आहेत. यासह सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते झाले आहेत. जेलरला सन पिक्चर्सचा पाठिंबा होता”.

रजनीकांत हे नेहमीच चित्रपटासाठी मानधनासह, त्याच्या नफ्यातील वाटाही घेतात. हा 100 कोटींचा चेक त्याचाच भाग आहे. आमीर खानही अशाच प्रकारे काम करतो. अनेकदा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हे अभिनेते आपलं मानधन परतही करतात. 

गुरुवारी, जेलरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 625 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. सोशल मीडियावर रजनीकांतचा एक फोटो शेअर करत मनोबाला विजयबालन यांनी लिहिले, “जेलरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर केवळ 22 दिवसांत 625 कोटींचा टप्पा पार केला. आता, 650 कोटी क्लबच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे. आठवडा 1 – 450.80 कोटी, आठवडा 2 – 124.18 कोटी, आठवडा 3 – 47.05 कोटी, आठवडा 4 दिवस 1 – 3.92 कोटी. एकूण – ₹625.95 कोटी.”

नेल्सन दिलीपकुमार यांनी जेलर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जेलरमध्ये रजनीकांत हे निवृत्त पोलीस अधिकारी टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, मोहनलाल (पाहुणे कलाकार), जॅकी श्रॉफ, शिवराजकुमार, योगी बाबू आणि वसंत रवी हेदेखील चित्रपटात आहेत. 10 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर रजनीकांत ‘लाल सलाम’ या चित्रपटात दिसणार आहेत.

रजनीकांत हे नेहमीच चित्रपटासाठी मानधनासह, त्याच्या नफ्यातील वाटाही घेतात. हा 100 कोटींचा चेक त्याचाच भाग आहे. आमीर खानही अशाच प्रकारे काम करतो. अनेकदा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हे अभिनेते आपलं मानधन परतही करतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *