Headlines

VIDEO : सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर! मात्र जुन्या घरातून पाय निघेना

[ad_1]

Sai Tamhankar New House in Mumbai : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही चांगलीच चर्चेत असते. सई गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहते. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की इतकी वर्षे सई ही भाडेतत्वार राहत होती. आता मात्र, सईनं स्वत: चं हक्काच घर खरेदी केलं आहे. त्या घराला ती माझं घर असं हक्कानं बोलत असते. नवीन घरात गेल्यावर एक नवी सुरुवात होते. पण सई ही तिच्या जुन्या घराच्या आठवणीत अजून आहे. नुकताच सईनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सईनं तिच्या घराची शिफ्टिंग करण्यापासून अखेर रूम सोडतानाचा तो क्षण कसा होता हे दाखवलं आहे. या व्हिडीओत सई भावूक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान, सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

सईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सईनं आधी तिच्या शिफ्टिंगचे काही ग्लिम्प्स शेअर केले आहेत. त्यानंतर सई या व्हिडीओत बोलताना दिसते की मला खरंच जायचं नाहीये, मला माहितीये की ते घर मोठं आहे, छान आहे. पण काही गोष्टी अशा लगेच नाही सुटत. ही जागा तशी आहे. या घराने मला खूप दिलंय. या घरानं खूप काही पाहिलंय’. तर हा व्हिडीओ शेअर करत सईनं कॅप्शन दिलं की ‘द एलेव्हन्थ प्लेस, पुन्हा घाबरून आणि उत्साहाने, मी नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक स्वप्न पूर्ण झालंय, माझं पहिलं मुंबईतील घर, खूप मोठा टप्पा पार केलाय, घरी बोलावण्याचे ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील. पण आनंदादरम्यान, एक कडू आठवण, एके काळी जे माझं घर होतं त्याला मी निरोप देते, परिचित भिंती आणि जुन्या निवासस्थानाचा निरोप घेतेय, ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते सोडतेय,’ असं सई म्हणाली.

पुढे याविषयी बोलत असताना सई म्हणाली की ‘प्रत्येक खोली बांधताना आठवणी कुजबुजतात, हास्याचे आणि फुललेल्या क्षणांचे प्रतिध्वनी, भिंतींवर भूतकाळातील कथा आहेत, काळामध्ये कोरलेल्या, भावनांचा सिम्फनी, एक गुंफणारा यमक. पण मी पुढे या नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना, विनम्र कृतज्ञतेनं माझं मन भरून आलंय. केलेल्या आठवणी आणि शिकलेल्या धड्यांसाठी, या नवीन घरात, नवीन स्वप्ने विणली जातील. म्हणून मी कृतज्ञ आलिंगन देऊन निरोप घेते. मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक प्रकाशाचा किरण.’ चाहते आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यासोबतच सईने तिचं स्वतःचं युट्यूब चॅनेलदेखील सुरू केलं आहे.’

हेही वाचा : ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’; Jawan मधल्या डायलॉगसंदर्भात समीर वानखेडेंची सूचक पोस्ट; म्हणाले, ‘मी जे…’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता माळीनं खुलासा केला होता की सई आता एका नव्या घरात शिफ्ट झाली आहे. इतकंच नाही तर सईनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या जुन्या घरातला एक फोटो शेअर करत ‘दहावी जागा’ असं कॅप्शन दिलं होतं. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *