Headlines

प्रियांका परिणीतिमध्ये बिनसलं? लग्नाला न येण्याचं कारण आलं समोर

[ad_1]

Priyanka Chopra not in Parineeti’s Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. परिणीतिनं आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्याशी काल 24 सप्टेंबर रोजी उदयपुरमध्ये सप्तपदी घेतल्या. त्यांच्या या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्या सगळ्यांनी सोशल मीडियावर लग्नातील अनेक खास फोटो शेअर केले. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष या गोष्टीनं वेधलं की परिणीतिची दिदी प्रियांका चोप्रा, भाऊजी निक जोनस आणि त्यांची लेक मालती मेरीनं हजेरी लावली नाही. इतकंच नाही तर यावेळी प्रियांकानं परिणीतिला किंवा राघव चड्ढा यांना कोणतही गिफ्ट दिलं नाही. आता या सगळ्यात प्रियांकाचं परिणीतिच्या लग्नात हजेरी न लावण्याचं कारण समोर आलं आहे.

परिणीति आणि राघव यांचं रॉयल लग्न हे राजस्थानमध्ये झाले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातील एक व्हिडीओ हा प्रियांकाची आई मधू चोप्रा यांचा आहे. मधू यांचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांना विचारलं की प्रियांका चोप्रा लग्नात का सहभागी झाली नाही. त्या मागचं कारण काय आहे. त्यावर उत्तर देत मधु चोप्रा म्हणाल्या, ‘काम असल्यानं ती येऊ शकली नाही. त्यावेळी पापाराझींनी विचारलं की मग काही गिफ्ट वगैरे दिलं आहे का?’ त्यावर उत्तर देत मधु चोप्रा म्हणाल्या की ‘त्यांना या गोष्टीची परमिशन नव्हती, घ्यायचं द्यायचं नाही, फक्त आशीर्वाद द्यायचे होते.’  

परिणीति आणि राघव यांच्या लग्नात सानिया मिर्झा, मनीष मल्होत्रा आणि हरभजन सिंहसोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 22 तारखेपासून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. त्या दरम्यान, परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये चूडा कार्यक्रम, हळद, मेहंदी आणि संगीत देखील होते. दरम्यान, परिणीति चोप्रानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नातील काही खान फोटो शेअर केलेत. त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

हेही वाचा : कतरिना कैफ प्रेग्नंट? प्रत्येक कार्यक्रमात ‘या’ कारणामुळे एकटा जातोय विकी कौशल

दरम्यान, एकीकडे परिणीतिचं लग्न झालेलं असताना प्रियांका ही तिच्या लेकीसोबत वेळ व्यथित करताना दिसत आहे. प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर केला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *