Headlines

बापरे! परिणीतिच्या लग्नाचा ‘हा’ लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास

[ad_1]

Parineeti Chopra Lehenga : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रानं काल 24 सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नात अनेक नियम असतानाही त्यांचा एक फोटो समोर आले होते. त्यानंतर परिणीतिनं तिच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. मात्र, आता परिणीतिनं परिधान केलेला लेहेंगा हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्या सिंपल दिसणाऱ्या लेहेंग्यानं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचा हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल 2500 तास लागल्याचे समोर आले आहे. 

परिणीतिचा लग्नाचा लेहेंगा हा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं डिझाईन केला होता. परिणीतिचा हा लेहेंगा बेज रंगाचा असून हेवी एम्बेलिश्ड आहे. या लेहेंग्याला बनवण्यासाठी मनिष मल्होत्राला 2500 तास लागले आहेत. मनिष मल्होत्रानं त्याच्या संपूर्ण टीमच्या मदतीनं हा खास लेहेंगा बनवला आहे. सुंदर टोनल इक्रु बेसन सजवला आहे. हा लेहेंगा पूर्ण हॅन्डवर्कनं बनवण्यात आला आहे. त्याच्यावर असलेली नक्क्षी आणि मेटल सेक्विननं सजवलं आहे. हे सगळं तिच्या जाळीदार आणि ट्यूल फ्रेमवर्कच्या दुपट्ट्याला शोभेल असा आहे. 

परिणीतिचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परिणीतिनं तिच्या लेहेंग्यासोबत कॅरी केलेल्या ओढणीवर राघवचं नाव होतं. राघवचं नाव लिहिण्यासाठी सोन्याच्या धाग्याचा वापर करण्यात आला आहे. परिणीतिच्या या बेज लेहेंग्याला आणखी चांगला लूक देण्यासाठी अनकट्स, जाम्बियन आणि रुसी पन्यानं बनवण्यात आलेला नेकलेस घातला आहे. या ब्रायडलसेटमध्ये कानातले झुमके, बिंदी आणि हाथफूल देखील आहेत. या दागिन्यांनी परिणीतिचा लूक आणखी चांगला दिसत आहे. 

हेही वाचा : कॉमेडी किंग जॉनी लिव्हर लॉलीचा मोठा फॅन… नम्रताला दिले ‘हे’ महागडे गिफ्ट

दरम्यान, परिणीतिनं सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यात एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो आहे तर त्यांच्या लग्नातील काही इनसाईड फोटो आहेत. ते फोटो शेअर करत परिणीतिनं ‘पहिल्यांदा जेव्हा आपण एकत्र ब्रेकफास्ट टेबलवर बोललो, आपल्या हृदयाला ठाऊक होते. तेव्हा पासून ते या दिवसाची प्रतिक्षा करत होते… अखेर श्री आणि श्रीमती झाल्यानं आनंद होतोय. एकमेकांशिवाय राहु शकलो नसतो… आता आयुष्यभरासाठी एकत्र’, असं कॅप्शन दिलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *