Headlines

Ponniyin Selvan 2 नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल इतक्या कोटींची कमाई!

[ad_1]

Ponniyin Selvan 2 Box Office Collection Day 1: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ चित्रपट काल 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खरंतर जेव्हा ‘पोन्नियिन सेल्वन: 1’ प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चाहते त्याचा दुसरा भाग कधी येणार याची प्रतिक्षा करत होते. पण आता त्यांची प्रतिक्षा संपली असून काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता दुसऱ्या भागानं बॉक्सऑफिसवर खूप दमदार कामगिरी केली आहे. 

तामिळे चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात हिट चित्रपटांमध्ये ‘पोन्नियिन सेल्वन: 1’ नं केला होता. तर ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ नं बॉक्स ऑफिसवर 32 कोटींची कमाई केली आहे. पण ही रिपोर्ट्सनुसार मिळालेली माहिती आहे. जगभरात या चित्रपटानं 80 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या भागाची कमाई पहिल्याच्या तुलनेत दोन कोटी कमी आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप आतुर होते. कारण चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची आतुरता ही खूप वाढली होती की पुढे काय होणार आहे. 

‘कोइमोई’च्या वृत्तानुसार, ‘PS-2’ ने प्रदर्शनापूर्वी 7.6 कोटी रुपयांची अॅडव्हान्स तिकिटांची बूकिंग झाली होती. तर, पहिल्या भागाची अॅडव्हान्स बूकिंग 16 कोटी रुपयांची झाली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्यामते PS-2 ची तुलना ‘केजीएफ: चॅप्टर 2’ किंवा ‘बाहुबली 2’ शी करणं योग्य नाही. कारण त्या दोन्ही चित्रपटांच्या दुसऱ्या भागांइतकी चाहत्यांना PS-2 साठी पुरेशी प्रतीक्षा करावी लागली नाही. तर चित्रपटानं 2023 या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा दुसरा चित्रपट आहे. 

हेही वाचा : ‘तुम्ही बेडरूममध्ये काय करता…’, कंगना रणौतनं Same Sex Marriage केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, हा बिग बजेट आणि मल्टी स्टारर असलेला ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटाच्या कास्ट विषयी बोलायचे झाले तर चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्थी, तृषा, जयम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धूलिपालासोबत सरधकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिबन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नासर हे कलाकार आहेत. तर ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची पटकथा ही कल्कि कृष्णमूर्ति यांच्या नॉव्हेलवर आधारीत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *