Headlines

Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या मुलासोबत केलं असं काही की, Video Virel झाल्यानंतर नेटकरी म्हणाले…

[ad_1]

Kritika Malik And Payal Viral Video : यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याचा दोन बायका पायल आणि कृतिका मलिक हे सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्ध आहेत. यूट्यूबर अरमान प्रत्येक क्षणा क्षणाला त्या चॅनलेवर व्हिडीओ टाकत असतो. नुकतचं त्याचा घरी चिमुकल्यांचं आगमन झालं आहे. दुसरी पत्नी कृतिका मलिक हिला मुलगा झाल्यानंतर नुकतचं पहिली पत्नी पायलला जुळी मुलं झाली. पायलला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. 

पायलला हॉस्पिटलला घेऊन जाण्यापासून तिथल्या प्रत्येक क्षणाचा व्हिडीओ हे दोघे सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत. अरमानने अजून एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं आहे. 

 दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या मुलासोबत…

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कृतिका पहिल्या पत्नी पायलच्या मुलाला स्तनपान करताना दिसतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पायलला खोकला असल्याने ती बाळांना दूध पाजू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी पायलच्या जुळ्या मुलांना कृतिकाने स्तनपान करावं असा सल्ला दिला आहे. 

कृतिकाने लगेचच मातृत्वाची भावना जपत पायलच्या बाळाला स्तनपान करताना दिसली.  हा एक हृदयस्पर्शी हावभाव असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. 

कृतिकाही काही दिवसांपूर्वी आई झाली आहे. तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पहिली पत्नी पायलला सी सेक्शनद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. शिवाय पायलची दोन्ही गर्भधारणा ही आयव्हीएफद्वारे झाली आहे. पायलच्या मुलाचं नाव अयान मलिक तर मुलीचं नाव तुबा मलिक ठेवलं आहे. 

तर कृतिका मलिक हिने 6 एप्रिलला गोंडस बाळाला जन्म दिला. या मुलाचं नाव त्यांनी जैद मलिक असं ठेवलं आहे. या नावावरून नेटकऱ्यांनी अरमान मलिकला ट्रोल केलं होतं. 

अरमान मलिकने 2011 मध्ये पायलशी लग्न केलं होतं. या दोघांना चिरायू नावाचा मुलगा आहे. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा दोन गोंडस बाळांचं आगमन झालं आहे. अरमानने पायलला घटस्फोट न देता 2018 मध्ये कृतिका नावाच्या मुलीशी लग्न केलं. कृतिका ही पायलची बेस्ट फ्रेंड आहे. आज हे तिघे एकत्र संसार करतात. कृतिकाला 6 एप्रिलला मुलगा झाला. आता हे तिघं आणि चार मुलं एकत्र नांदत आहेत.

कृतिका पायलची हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घेताना दिसत आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *