Headlines

‘तुम्ही बेडरूममध्ये काय करता…’, कंगना रणौतनं Same Sex Marriage केलं मोठं वक्तव्य

[ad_1]

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना कोणत्याही विषयावर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. सध्या सगळीकडे ‘समलैंगिक विवाहाला’  मान्यता देण्यावर चर्चा सुरु आहे. सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स सगळीकडे होणारी चर्चा पाहता. त्यावर सुरु झालेला वाद पाहता कंगनानं त्यावर तिचं मत मांडलं आहे. 

कंगनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत समलैंगिक विवाहाबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही कोणीही असा, तुम्ही पुरुष/स्त्री/इतर काहीही असा, तुमचे जेंडर काय आहे, यानं काही फरक पडत नाही. या मॉर्डन जगात आपण अभिनेत्री, दिग्दर्शिका असे शब्द सुद्धा वापरत नाही. त्यांना देखील आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणतो. तुम्ही या जगात काय करत आहात हीच तुमची ओळख आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता याने तुमची ओळख होत नाही,’ असे कंगना म्हणाली. 

पुढे कंगना म्हणाली, कधीच कोणत्या व्यक्तीला त्याच्या लिंग किंवा इतर कोणत्याही शारीरिक वैशिष्ट्य लक्षात घेत पाहू नका. तुम्हाला माहित आहे ना कंगना ही फक्त महिला समजणाऱ्यांचे काय झाले. त्यांना पाहून खूप मोठा धक्का बसला, कारण मी अशी व्यक्ती नाही जी स्वत:ला किंवा इतरांना या नजरेने बघेन. मी नेहमीच अशा एका ठिकाणी असते जिथे फक्त स्त्रीया, पुरुष, होमो, हेट्रो, स्ट्रॉन्ग किंवा मग कमजोर अशा लोकांसोबत नसते. तर मी इथ पर्यंत पोहोचलेच नसते. मी कधी कोणाला त्यांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तुम्ही लोक एवढा वेळ कुणाच्या शारीरिकतेवर का घालवता? माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर तुम्ही फार पुढे जाणार नाही. त्यामुळे स्वत: ला लिंगाच्या विचारांपासून मुक्त करा. जसे आहात तसे उठा आणि चमका. शुभेच्छा.’  कंगनानं केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात शेवटी ती धाकड या चित्रपटात दिसली होती. तर ‘एमरजेंसी’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय तिचा तेजस हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर  ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात ती दिसणार असल्याचे म्हटले जाते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *