Headlines

वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला

[ad_1]

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील  देवरुख येथील क्रांतीनगर परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये शारदा दत्तात्रय संसारे या सुमारे ऐशी वर्षांच्या वृध्द महिलेचा दागिन्यांसाठी खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री या महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला. मुलगा दीपक संसारे याच्यासह शारदा संसारे या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. दीपक सोमवारी सकाळी ९.३० वाजता कामासाठी घराबाहेर पडले .

दुपारी ते घरी परतले तेव्हा घराला कुलुप होते. दीपक यांनी आईशी संपर्क करण्याचा प्रय केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने कुलुप तोडले. पण शारदा संसारे घरात नव्हत्या. संध्याकाळपर्यंत दिपक यांनी आईचा शोध घेतला. रात्री घरातील न्हाणीघरात ते हात—पाय धुण्यासाठी गेले असता लालसर रंगाचे पाणी नळातून आल्यामुळे दिपक यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मित्रांसह त्यांनी सहकार्?याच्या गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीमध्ये पाहिले असता शारदा यांचा मृतदेह दिसून आला.

त्यांच्या कपाळावर खोल जखम झाली होती. तसेच हातातील सोन्याच्या पाटल्या, गळ्यातील माळ व कानातील कुडी गायब झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव सहकार्?यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य ओळखून तपास तीन टप्प्यात सुरु झाला. ठसे तज्ज्ञ, श्वनपथक व फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन नोंदी घेतल्या. चोरटय़ाच्या शोधासाठी आणलेले श्वन बिल्डिंग परिसरातच घुटमळले.

रत्नगिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या प्रकरणी अज्ञाताविरुद्घ भा.दं.वि.क. ३०२, २०१, ३९४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *