Headlines

‘ना मालिका, ना चित्रपट मग पैसे येतात कुठून?’, मिताली ट्रोल होताच सिद्धार्थनं ढाल होत दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

Siddharth Chandekar Mitali Mayekar : ना मालिका, ना चित्रपट मग पैसा येतो कुठून? असं म्हणत काही दिवसांपुर्वी अभिनेत्री मिताली मयेकर हिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यावर मितालीनंही त्या नेटकऱ्याला अगदी सडेतोड उत्तर दिलं होतं. मिताली आणि सिद्धार्थ हे आपल्याला गेल्या काही दिवसांपासून सतत परदेश भ्रमंतीवर दिसत आहेत. त्यांचे सुंदर फोटो हे खरंतर प्रसंशा करण्यासारखेच. परंतु ऑनलाईन ट्रोलर्सना मात्र त्यांच्या या जगभ्रमंतीचा जळफळाट होतो हेच दिसून येते आहे. मितालीला ट्रोल करण्यावरून आता तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर यानं देखील खणखणीत उत्तर दिलं आहे. सध्या त्याच्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. दोन दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आता सिद्धार्थ चांदेकर नेमकं यावर काय म्हणाला आहे हे पाहुयात. 

आतापर्यंत मिताली आणि सिद्धार्थ यांनी अनेक देश पाहिले आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. स्पेन, युरोप, थायलंड, मलेशिया, दुबई अशा अनेक देशांत त्यांनी भ्रमंती केली आहे. काही दिवसांपुर्वी मितालीनं आपला एक फोटो हा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका नेटकऱ्यानं आगाऊ कमेंट केली होती. ‘ना मलिका, ना चित्रपट मग इतका पैसा येतो कुठून?’ अशी कमेंट त्यानं केली होती. त्यावर मितालीनं जश्यास तसे उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, ‘झाड लावलंय. हव्यात तुला बिया’. तिच्या या कमेंटचीही बरीच चर्चा रंगलेली होती. मितालीनं सध्या कुठलीच मालिका आणि चित्रपट केला नाही मग जगभ्रमंती करण्यासाठी त्याच्याकडे इतका पैसा कुठून येतो? असा सवाल त्याचा होता. 

आता यावर सिद्धार्थ चांदेकर यानंही स्पष्ट उत्तर दिलं आहे. यावेळी मिताली आणि सिद्धार्थनं नुकताच इट्स मज्जा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी सिद्धार्थनं आपली बायको नेमकं काय काम करते यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला, ”मितालीला तिचं नवं वेड जाणवलं आहे. खरंतर हे वेड तिच्यामध्ये पूर्वापासूनच होतं पण त्याच्यासाठी झगडावं कसं? हे तिला नव्यानं उमगलं. त्यावर ती आता बेहद्द कामं करते आहे आणि म्हणजे फिरणं. तिला फिरायला प्रचंड आवडतं.” 

”त्यामुळे तिनं ठरवलं आहे की जर मला संपूरण जग फिरायचं आहे तर त्या दृष्टीनं मला काम करायला हवं. त्यासाठी लागणारी कामं हे आपल्याला करायलाच हवीत. हे ती आता स्वत:हून करू लागली आहे. एखादी गोष्ट, एखादी डील करण्यासाठी ती स्वत: प्रयत्न करते. घरात कंपनी असल्यासारखी वावरते. चारपाच माणसांची कामं ती स्वत: एकटी करते. हे सगळं ते घडवून आणते जेणेकरून तिला फिरायला जाता येईल. याला ढोबळ शब्दात सांगायचे झालं तर फुकटात फिरायला जाता येईल यासाठीचे प्रयत्न आहे असंही म्हणता येईल. पण ते फुकटात फिरणं यासाठीही तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं पण ते पैसे नाहीत.”

‘हे’ काम करत पैसे कमावते मिताली? नक्की काय जाणून घेऊया.

यावेळी मितालीबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, ”त्यासाठी तिची ती बौद्धिक क्षमता वापरते. एखाद्या कंपनीला हॅण्डल करत त्यांच्याशी कसं बोलायचं हे कौशल्य तिच्याकडे आहे. एखाद्या फॉरेनच्या कंपनीनं तिला एखादी जाहिरात शूट करून देण्यासाठी सांगितलं की ती तशीच मोबाईलवर शूट करून देण्यापेक्षा ती जाहिरात योग्य पद्धतीनं शूट करून देते. त्यासाठी कॅमेरा सेटअप, हेअर, मेकअप, लाईटिंग, व्हिडीओग्राफर या सर्वांवरती ती स्वत:चा पैसा वापरते. माझ्यासाठी एखाद्या कंपनीची जाहिरात झाली तर त्यांच्याशी डील करण्यासाठी सुद्धा मी तिलाच सांगतो कारण त्यांच्याशी कसं बोलावं हे तिला उत्तम माहिती आहे. मला हे कळतं नाही परंतु ती हे उत्तम प्रकारे करते आणि याचा मला अभिमान आहे कारण स्वत:च्या गोष्टी स्वत: करणं फार अवघड असतं.”

ट्रोलिंगवर काय म्हणाला सिद्धार्थ? 

मितालीला ट्रोल करण्यावरून सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की, ”मला त्यांचा बिलकुल राग येत नाही. कारण हे सर्व घडतं कसं याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. कदाचित त्यांच्या जागी मी जरी असतो तरीही मला हेच वाटलं असतं जे त्यांना वाटलं आहे. तू सिनेमा, मालिका करत नाहीस मग तुझ्याकडे पैसा येतो कुठून? पण मी तिचा नवरा आहे. त्यामुळे मला माहिती आहे की ती काय काय करत असते. जर परदेशातले क्लायंट असतील तर ती पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्याशी डील करत असते कारण तिकडच्या वेळा सांभाळून त्यांच्याशी बोलावं लागतं.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *