Headlines

‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटातून अशोक सराफ बाहेर? चर्चांना उधाण

[ad_1]

Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी कलाविश्वात असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचा समावेश सुपरहिट चित्रपटांच्या यादीत होतो. ‘चिमणी-पाखरं’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘जत्रा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘टाईमपास’ हे चित्रपट कायमच टॉप 10 यादीत पाहायला मिळतात. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ या जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. 

शूटींगदरम्यानचा व्हिडीओ समोर

सचिन पिळगावकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या मुहुर्तचा क्लॅप हातात घेऊन हसताना दिसत आहेत. त्याबरोबरच अभिनेते सचिन पिळगावकर, अली असगर, स्वप्निल जोशी हे कलाकारही शूटींगच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावेळी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाची संपूर्ण टीमही या ठिकाणी उपस्थित आहेत. 

या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. “शूटींग सुरू, मज्जा सुरू, ‘नवरा माझा नवसाचा २’ गणपती बाप्पा मोरया!”, असे सचिन पिळगावकरांनी म्हटले आहे. सचिन पिळगावकरांच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यात एकाने ‘अशोक सराफ सरांशिवाय कसं काय सुरू केलं म्हणतो मी? SHOOTINGAAAA?’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘पाहिला चित्रपट जेवढा धमाल होता… तसाच हा सुद्धा होऊ द्या… God bless you’, अशी कमेंट एकाने केली आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता चित्रपटाची कथा काय असणार? कधी प्रदर्शित होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच समोर येणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *