Headlines

naresh maske replied to Thackeray group leader on Freedom of expression spb 94

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र असल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाकडून देण्यात आले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातोय? फडणवीसांनी ठेवलं नियमांवर बोट; म्हणाले “सर्वांसाठी…”

काय म्हणाले नरेश म्हस्के?

“ठाकरे गटातील नेत्यांना नरेश म्हस्केंचे प्रत्युत्तरठाण्यात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत अपशब्द वापरण्यात आले. तसेच त्यांची नक्कलही करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता. महिला राष्ट्रपतींच्या नावावरून अशा प्रकारची मस्करी करणे नेत्याना शोभा देत नाही. शेवटी जे पेराल, तेच फळ मिळतं”, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

“आता गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाला अभिव्यक्ती स्वातंत्र आठवते आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले, त्यानंतर त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून जेलमध्ये टाकण्यात आले होते. तेव्हा तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र कुठे गेले होते? ही दिशा आपणच महाराष्ट्राला दाखवली आहे. त्यामुळे आता आरडाओरडा करण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “मी आणि रणवीर…” वैवाहिक आयुष्याबद्दल दीपिका पदुकोणने सोडलं मौन

नेमकं काय घडलं?

रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणात भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दसरा मेळाव्यातील भाषणाची नक्कल केली होती. तर सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर विनायक राऊत यांनी नारायण राणे यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्यात खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *