Headlines

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या शिरला थेट स्वयंपाकघरात; सांगलीतील घटना|A leopard search of huntin gentered kitchen straight away incident in Sangli

[ad_1]

सांगली : भक्ष्य असलेल्या मांजराची शिकार करण्यासाठी पाठी लागलेला बिबट्या थेट स्वयंपाकघरात शिरण्याचा प्रकार वाळवा तालुययातील मरळनाथपूर येथे मंगळवारी रात्री घडला. जेवण करीत असलेल्या घरातील लोकांनी दार बंद करून वन विभागाला माहिती देताच, वन विभागाने मोठ्या हिंमतीने दार उघडून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

याबाबत मिळालेली माहिती अशी, मरळनाथपूर गावातील पश्‍चिम दिशेला असलेल्या डोंगरालगत बाळासाहेब किसन हजारे यांची वस्ती आहे. काल रात्री घरातील सर्वजण स्वयंपाक घरात जेवण करीत असताना पाळीवर मांजर घरात आले. या मांजरापाठोपाठ बिबट्या घराच्याा पडवीतून स्वयंपाक घरात शिरला. जेवण तसेच सोडून सर्व जण बाहेरच्या पडवीत आले आणि स्वयंपाकघराचे दार कडी लावून बंद केले. तात्काळ ही माहिती वन विभागाला देण्यात आली.

हेही वाचा : ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातोय? फडणवीसांनी ठेवलं नियमांवर बोट; म्हणाले “सर्वांसाठी…”

घटनेची माहिती वनविभागाला कळताच उपवनसंरक्षक निता कट्टे,  सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूरचे सुरेश चरापले, वनरक्षक रायना पाटोळे, अक्षय शिंदे, वनसेवक शहाजी पाटील, अनिल पाटील व प्राणी मित्र युनूस मनेर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बिबटया वयाने लहान असल्याने त्याची आई जवळपासच रेंगाळत असल्याची शक्यता लक्षात घेउन बिबट्याला पिंजर्‍यात बंदिस्त न करता असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून, त्याच्या जाण्याचा मार्ग मोकळा केला. दार उघडताच बिबट्या घरातून बाहेर पडून नैसर्गिक अधिवासात निघून गेला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *