Headlines

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1]

Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. नाना पाटेकर यांनी व्हिडीओ शेअर करत माफी देखील मागितली. मात्र, आता ज्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती, त्या तरुणाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

काय म्हणाला तरुण?

मी गंगा नदीत डुबकी मारायला गेलो होतो आणि जेव्हा मी नाना पाटेकर तिथं शूटिंग करत असल्याचं पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला. ते माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मला फक्त त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. तिथं उपस्थित असलेल्या गार्ड आणि इतर क्रू मेंबर्सनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या आवडत्या स्टारला समोर पाहून मी इतका उत्साहित झाला की त्यांचं काही ऐकलं नाही आणि फोटो काढण्यासाठी नानांच्या जवळ गेलो. नानांच्या वागण्याने मला अपमानास्पद वाटलं. मी कोणतीही पोलिस तक्रार करणार नाही, असंही तरुणांने सांगितलं आहे.

Nana Patekar याचं स्पष्टीकरण

एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मी एका मुलाच्या कानशिलात लगावताना दिसतोय. हा सीन आमच्या चित्रपटातील आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. आम्ही दुसरी रिहर्सल करणार होतो. दिग्दर्शकानं मला हा सीन सुरु करण्यासाठी सांगितलं. आम्ही रिहर्सल सुरु करणार तितक्यात व्हिडीओत दिसणारा मुलगा आला. तो कोण आहे हे मला माहित नव्हतं, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. 

मला कळलं की, तो आमच्या क्रुचा भाग नाही. त्यामुळे मी त्याला परत बोलावलं, पण तो पळून गेला.  काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही. त्याची मला माफी मागायची आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न देखील केला, असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *