Headlines

MP Bus Accident : इंदूरजवळील अपघातातील बस अमळनेर आगाराची; चालक, वाहकासह अनेक प्रवासी जळगाव जिल्ह्यातील

[ad_1]

मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार या जिल्ह्यांच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील अमळनेर आगाराची असून, बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे. बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील (क्रमांक 18603) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (क्रमांक 8755) यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसून अद्याप शोधकार्य सुरु असल्याची माहिती भगवान जगनोर यांनी दिली आहे.

हेही वाचा- MP Bus Accident: महाराष्ट्राच्या एसटीला मध्यप्रदेशात भीषण अपघात; १३ ठार

सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह सापडले

अमळनेर आगाराची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा सुरु आहे. सकाळी साडेसातला इंदूर येथून अमळनेर आगाराची बस परतत होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या खलघाट गावाजवळ आल्यानंतर बस नर्मदा नदीपात्रात कोसळली. बसमध्ये सुमारे पन्नास ते साठ प्रवासी असून, यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्तापैकी सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या भीषण अपघातानंतर परिसरातील लोकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

हेही वाचा- अकोला : पश्चिम वऱ्हाडात संततधार पाऊस ; नदी-नाल्यांना पूर

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु

बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतीसाठी ०९५५५८९९०९१ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *