Headlines

‘Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही’; शाहरुखच्या ‘या’ अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

[ad_1]

Taapsee Pannu: अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट आजही चांगलाच चर्चेत आहे. अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. तर अनेकांना हा चित्रपट आवडला नाही. जावेद अख्तर आणि स्वानं किरकिरे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. चित्रपटात दाखवण्यात येणारी हिंसा आणि महिलांविरोधी असणाऱ्या डायलॉग्सवर आक्षेप घेतला. हे सगळं चर्चेचा विषय ठरलं होतं. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिनं थेट सांगितलं की असे चित्रपट ती कधी कणार नाही. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून तापसी पन्नू आहे. तापसीनं यावेळी असे चित्रपट न करण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. 

तापसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चाहती नाही असं सांगितलं आहे. तर ती कधीच असा चित्रपट करणार नाही असं देखील तिनं सांगितलं. तापसीनं ही मुलाखत राज शमानी यांच्या यूट्युब चॅनलला ही मुलाखत दिली होती. यावेळी तापसी ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या सक्सेसवर बोलत असताना असा चित्रपट नाही करणार म्हणाली. 

काय म्हणाली तापसी?

‘अनेकांनी मला या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. हे बघा मी कट्टर विचारांची नाही, त्यामुळे अनेक लोकांच्या विचारांच्या मी विरोधात आहे. याची तुलना हॉलिवूडशी करू नका आणि हे बोलू नका की जर तुम्हाला गॉन गर्ल आवडला तर तुम्हाला ‘ॲनिमल’ कसा आवडला नाही? तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसोबत डील करत आहात. हॉलिवूडमध्ये लोक कलाकारांच्या हेअर स्टाइलची कॉपी करत नाहीत. ते खऱ्या आयुष्यात चित्रपटातील डायलॉग वापरत नाहीत’, असं तापसी म्हणाली. 

तापसीनं पुढे सांगितलं की, ‘कोणत्याही चित्रपटाला पाहिल्यानंतर तो खऱ्या आयुष्यात महिलांचा पाठलाग करू लागतो, असं नाही. पण आपल्या देशात असं सगळं होतं. हेच आपलं सत्य आहे. तुम्ही आपल्या चित्रपटसृष्टीची तुलना हॉलिवूडशी करू शकतं नाही आणि हे बोलू शकतं नाही की हे चित्रपट पाहिल्यानंतर इंफ्यूलेंसड व्हायला नको आणि जर तुम्ही इंफ्यूलेंसड होत आहात, तर तुम्हाला फिल्टर लावण्याची गरज आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीचं अनुकरण करायला हवं आणि कोणत्या नाही.’

तापसीनला पुढे विचारण्यात आलं की ती ‘ॲनिमल’ सारखे चित्रपट कधी करेल का? किंवा असे चित्रपट बनवले पाहिजे का? तर उत्तर देत तापसी म्हणाली असे चित्रपट बनले पाहिजे, मात्र, एका वेगळ्या परिणामासोबत, असे विचार जे तुम्हाला वाटतं की समाजात असायला हवे. लोकांनी चित्रपट पाहून काहीही शिकायला नको. मात्र, वाईट गोष्ट ही आहे की समाजाचा विचार करता माझ्या हातात जे आहे त्याचा वापर करण्याची गरज आहे. असं यामुळे कारण बॉलिवूडमध्ये कलाकार असल्यानं तुम्हाला एक पावर मिळते. त्या पावरसोबत जबाबदारी मिळते. मी त्यांच्यातली नाही. जे XYZ कलाकारांना सांगेल की त्यांनी असे चित्रपट करायला नको. त्यांची स्वत: ची निवड आहे. आपण एका स्वतंत्र्य देशात राहतो आणि आपल्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, जर माझ्याविषयी बोलायचं झालं तर मी  ‘ॲनिमल’ करणार नाही.’

हेही वाचा : ‘मी फेब्रुवारीत…’, रश्मिकासोबतच्या साखरपुड्यावर विजय देवरकोंडानं सोडलं मौन

तापसीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तापसी पन्नू लवकरच कॉमेडी-ड्रामा ‘वो लडकी है कहां’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अरशद सैयद करणार असून त्यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि प्रतीक बब्बर देखील दिसणार आहेत. दरम्यान, तापसीनं शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *