Headlines

‘मी फेब्रुवारीत…’, रश्मिकासोबतच्या साखरपुड्यावर विजय देवरकोंडानं सोडलं मौन

[ad_1]

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Engagement : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही नेहमीच चर्चेत असतात. त्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की दोघं लवकरच साखरपुडा करणार आहेत. मात्र, या बातमीवर अजून विजय किंवा रश्मिका या दोघांपैकी कोणीच दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर त्यांचे चाहते हे याच बातमीनं आनंदी झाले आहेत. साखरपुड्याच्या या चर्चांवर आता अखेर विजयनं मौन सोडलं आहे. 

विजय देवरकोंडानं लाइफस्टाइल आशियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि रश्मिकाच्या साखरपुड्यावर वक्तव्य केलं आहे. या अफवा असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ‘मी फेब्रुवारीत साखरपुडा करणार नाही. अशा अफवा मी दरवर्षी ऐकतो. मीडिया दर 2 महिन्यांनी माझं लग्न करू इच्छिते. ते फक्त माझ्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत’, असं विजय देवरकोंडा म्हणाला. 

विजय देवरकोंडानं दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, विजय आणि रश्मिका मंदाना साखरपुडा करत त्यांच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा करणार आहेत. 

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं सगळ्यांसमोर आपल्या रिलेशनशिपविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्या दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सगळ्यांना प्रचंड आवडते. ते दोघं अनेकदा विमानतळावर एकत्र दिसत नाहीत, मात्र परदेशात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे एकत्र जातात, असं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून जाणवते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

हेही वाचा : ‘रेखाजींनी शूटिंगदरम्यान मला मारलं, मी तासभर रडले पण…’; अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ भयानक अनुभव

दरम्यान, विजयच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर एकामागे एक असे अनेक चित्रपट आहेत. विजयचा आणि अभिनेत्री मृणाल ठाकुरचा ‘फॅमिली स्टार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फॅमिली स्टार’ मध्ये विजयच्या पहिल्या सुपरहिट ठरलेल्या ‘गीता गोविंदम’ प्रमाणेएक पारंपारिक मनोरंजक चित्रपट असणार आहे. रश्मिका विषयी ‘ॲनिमल’ या चित्रपटाच रणबीर कपूरसोबत दिसली होती. तर आता तिचे चाहते तिच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय ती ‘रॅम्बो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *