Headlines

mla nilesh lanke replied to radhakrushna vikhe patil statement on sharad pawar spb 94

[ad_1]

भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. ”भू-विकास बँक अस्तित्वात तरी आहे का?” असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला होता. शरद पवारांच्या या टीकेला भाजपा नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचे न घेता प्रत्युत्तर दिले होते. “शेतकरी किंवा कार्यकर्ते परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचं महत्त्व वाढत नाही, असं राजकारण त्यांनी अनेक वर्षांपासून केलं आहे. त्यामुळे या निर्णयाचं त्यांना दु:ख होणं स्वाभाविक आहे” असे ते म्हणाले होते. दरम्यान, विखे पाटलांच्या या टीकेला आमदार निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – “…तेव्हा तुम्ही काय करत होता?” राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला!

काय म्हणाले निलेश लंके?

“केंद्रीय मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. युपीएच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारलं की देशाचे कृषीमंत्री कोण आहेत, तर तो शेतकरी शरद पवार यांचे नाव घ्यायचा. मात्र, आता देशाचे कृषीमंत्री कोण आहेत? हे शेतकऱ्यांना माहिती नाही. तसेच राज्याच्या कृषीमंत्र्यांना म्हटलं की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तर ते म्हणतात, पाऊसच झाला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं योग्य नाही. शेतकऱ्यांबद्दल जेवढी आत्मीयता शरद पवारांमध्ये आहे, तेवढी या देशातील कोणत्याच नेत्यामध्ये नाही. माझ्या दृष्टीने शरद पवार यांच्यावर टीका करावी, इतकी तुमची उंची नाही”, असे प्रत्युत्तर आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.

हेही वाचा – “…मला तर आता मळमळायला लागलं आहे”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

“आज राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. ते यावेळी शेतकऱ्यांना निश्चित आधार देतील, असे वाटले होते. मात्र, पालकमंत्र्यांचा दौरा हा केवळ पर्यटन दौरा झाला. अत्यंत घाईत त्यांनी हा दौरा केला. रस्त्यावरूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली”, अशी टीकाही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *