Headlines

असं काय होतं ज्यामुळे डिंपलने Raveena Tandon च्या कानशिलात?

[ad_1]

Happy Birthday Raveena Tandon : आज अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्रीच्या भुतकाळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहे, ज्यामुळे रवीनाने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. अभिनेत्री तिच्या वर्तमानात आनंदी असली तरी चाहत्यांमध्ये सेलिब्रिटींचा भूतकाळ कायम चर्चेतत असतो. रवीनाच्या आयुष्यात असा एक दिवस आला जेव्हा अभिनेत्री डिंपलने अभिनेत्रीला कानशिलात लगावली. हा किस्सा आाहे ‘जिद्दी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा. (Raveena Tandon past)

1997 मध्ये ‘जिद्दी’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. सिनेमात अभिनेता सनी देओल आणि रवीना मुख्य भूमिकेत होते. शुटिंग दरम्यान रवीना सतत रडायची. त्यामागे कारण देखील तसंच होतं. रिपोर्टनुसार तेव्हा रवीना आणि अभिनेता अक्षय कुमार रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांच्या नात्यात वाद सुरु होते. (Raveena Tandon with akshay Kumar)

तीन वर्षे डेट केल्यानंतर अक्षयचं रवीनासोबत ब्रेकअप झालं, ज्याच्या धक्क्यातून जात असलेल्या रवीनासाठी वेळ कठीण गेला. जेव्हा सनी देओलने रवीनाला कारण विचारले तेव्हा तिने ही गोष्ट सांगितली, जे ऐकून सनी अक्षयवर चिडला. (Raveena Tandon with akshay Kumar relation)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ऐकल्यावर सनीला खूप राग आला आणि त्याने या मुद्द्यावर अक्षय कुमारचाही सामना केला. रवीनामुळे सनी आणि अक्षयमध्ये देखील वाद झाले. अक्षय आणि सनीच्या या वादामध्ये डिंपल यांनी देखील उडी मारली.  (Raveena Tandon with sunny deol)

रवीना आणि अक्षय कुमारची प्रेमकहाणी कोणापासून लपलेली नाही. त्याचप्रमाणे डिंपल आणि सनी देओलच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती. ‘जिद्दी’ सिनेमाच्या सेटवर सनी आणि रवीनाची चांगली मैत्री केवळ अक्षयलाच नाही तर डिंपललाही त्रासदायक ठरली होती. (sunny deol and dimple kapadia)

एका रिपोर्टनुसार, जेव्हा डिंपलला त्यांच्या जवळीकतेबद्दल माहिती मिळाली तेव्हा डिंपलला राग आला आणि तिने रवीना टंडनच्या कानशिलात लगावली. मात्र, या गोष्टीवर कोणीही सांगितलं नाही. 

या चौघांचे नात्यांत अनेक संकटं आली. पण काही काळानंतर त्यावर पूर्णविरामही लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयने रवीना टंडननंतर शिल्पा शेट्टीसोबत ब्रेकअप करून ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. (akshay kumar and shilpa shetty)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *