Headlines

मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

[ad_1]

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून केदार शिंदेंना ओळखले जाते. 2023 हे वर्ष केदार शिंदेंसाठी फारच खास ठरलं. गेल्यावर्षी त्यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ असे लागोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता त्यांच्या याच कामाची दखल चक्क जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिक असलेल्या फोर्ब्सने घेतली आहे. 

दिग्दर्शक केदार शिंदे हे ‘अगं बाई अरेच्चा!’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’ या एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून घराघरात पोहोचले. ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 90 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील गाणी, पोस्टर सर्वत्र सुपरहिट झाले. केदार शिंदेंच्या याच कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 

केदार शिंदेंसाठी पत्नीची खास पोस्ट

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिकाने नुकतंच काही ठराविक निर्मात्यांबद्दल एक लेख प्रदर्शित केला आहे. यात अॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबरच मराठमोळ्या केदार शिंदेंवरही लेख प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या लेखात केदार शिंदेंची सिनेसृष्टीतील कामगिरी आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेले यश याबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. आता याबद्दल त्यांची पत्नी बेला शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्या मासिकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी केदार शिंदेंचे कौतुक केले आहे.

“काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली.. Forbes India magazine मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहीलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पहात आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्ही सगळ्यांचं प्रेम कायम राहो.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ”, असेही त्यांनी यात म्हटले आहे. 

दरम्यान बेला शिंदे यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजी, टाळ्या वाजवतानाचा इमोजी, फायर इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. सध्या त्यांच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *