Headlines

मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय बादशाह? शिल्पा शेट्टीच्या पार्टीतील Video Viral

[ad_1]

Mrunal Thakur Boyfriend: शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे. रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे एका युजरने म्हटलं आहे. 

रेडिटवर एका युजरने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, मृणाल आणि बादशाह शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत गेलेत. ते दोघं डेट करत आहेत का? युजर्सच्या या प्रश्नावर अनेकांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. मृणाल ठाकूर आणि बादशाह हातात हात घालून शिल्पाच्या पार्टीतून बाहेर जाताना दिसत होते. एकाच कारमधून ते पार्टीसाठी आले होते. 

पार्टीत एकत्र

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत मृणालने हिरव्या रंगाचा लेंहगा परिधान केला होता. तर, बादशाह काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये पार्टीत सहभागी झाला होता. पार्टीतून बाहेर पडताना मृणाल ठाकूर पुढे होती तर तिच्या मागे बादशाह येताना दिसत होता. पार्टीतील काही फोटोही मृणालने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. स्टोरीवर तिने बादशाहसोबत फोटो पोस्ट केले आहे. तर, शिल्पा शेट्टीसोबतही त्यांनी अनेक फोटो पोस्ट केले होते. 

बादशाहचे आधीही झाले होते लग्न 

एका रेडिट युजरने म्हटलं आहे की, मला त्यांच्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती. बादशाहाचं पहिलं लग्न जॅस्मिन मसीह यांच्यासोबत झालं होतं आणि 2020मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना जेसी ग्रेस मसीह सिंह नावाची एक मुलगी असून तिचा जन्म 2017मध्ये झाला होता. त्यावरुनच एकाने कमेंट केली आहे की, त्याचे लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील आहे.

तेलगु अभिनेत्यासोबत लग्न करणार?

मृणाल आणि बादशाहचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने म्हटलं आहे की, ते दोघं डेट करत आहेत असं अजिबात वाटत नाही. मला वाटतं की खूप नॉर्मल आहे. हे खरं नाहीये, अशी अपेक्षा आहे. मृणाल एका तेलगु अभिनेत्याला डेट करतेय अशी अफवादेखील होती. मात्र, या महिन्यात मृणालने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटलं होतं. 

बादशाह आणि मृणालला एकत्र पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मृणालने बादशाहसोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर तिने फोटोची स्टोरी टाकली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *