Headlines

‘त्या’ एका गोष्टीपायी अजय देवगण घेतली श्रीदेवी यांच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ

[ad_1]

Ajay Devgan Sridevi: अजय देवगणचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यानं अनेक अभिनेत्रींसोबत एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनीही अजय देवगणसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांचीही विशेष चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्हाला माहितीये का की अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री होती जिच्यासोबत अजय देवगण यानं कधीही स्क्रीन शेअर केली नाही. ही लोकप्रिय सुपरस्टार आहे ती म्हणजे ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. नक्की काय होता यामागील किस्सा आपण यातून जाणून घेणार आहोत. श्रीदेवी यांनी अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमार या सगळ्यांसोबत अभिनय केला आहे. दक्षिणेतील मोठ्या सुपरस्टार्ससोबतही त्यांनी कामं केले आहे. परंतु अजय देवगणसोबत त्यांचे काम करायचे राहून गेले. 

ते दोघं एका चित्रपटासाठी एकत्र आले होते. परंतु तेव्हा काहीतरी असं घडलं की ज्यामुळे खुद्द अजय देवगणचाच पत्ता कट झाला आणि याचा आरोपही श्रीदेवी यांच्यावर आला होता. हा किस्सा आहे खुदा गवाह या चित्रपटाच्या वेळेसचा. यावेळी श्रीदेवी या फारच लोकप्रिय आणि मोठ्या सुपरस्टार अभिनेत्री होत्या. परंतु यातही त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर असाही एक आरोप होता की त्या अनेकांना त्रास देतात आणि आपल्या आवडत्या सहकलाकाराला त्या तिथे रिप्लेस करतात. 1993 मध्ये स्टारडस्टमध्ये एक इंटरव्हू आला होता ज्यात असं म्हटलं होतं की चंकी पांडे यांनाही श्रीदेवी यांनी अनेकदा चित्रपटांतून बाहेर काढले होते. 

अनेकदा बॉलिवूडमध्ये कलाकारांची घट्ट मैत्री पाहायला मिळते किंवा मग त्यांच्यातील टोकाची दुश्मनीही पाहायला मिळते. त्यातून काल झालेलं भांडणं विसरून दुसऱ्या दिवशी कलाकार एकमेकांशी एकत्रपणे बोलायलाही लागतात. अजय देवगणलाही असंच वाटतं होते की श्रीदेवी यांनी त्याला रिप्लेस केलं आहे. कारण खुदा गवाह या चित्रपटासाठी अजय देवगणचे नाव अगदी कन्फर्म होते परंतु आयत्यावेळी काहीतरी झाले आणि मग चक्क त्याला रिप्लेस करून त्याच्याजाही नार्गाजूनला कास्ट करण्यात आले होते. कदाचित याच कारणामुळे त्यांनी म्हणजेच श्रीदेवी आणि अजय देवगण यांनी एकत्र काम केले नसावे. श्रीदेवीसोबत त्यांनी कुठलाच चित्रपट केला नाही. त्यावेळी याची जोरात चर्चाही रंगलेली होती. 

असं म्हणतात की त्यावेळी अजय देवगणनं श्रीदेवी यांच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली होती. परंतु स्टारडस्टच्या मुलाखतीतून कळते की श्रीदेवी यांनी म्हटले होते की त्यांनी अजय देवगणला काढले नव्हते. कुणाला घ्यायचे, काढायचे हे मेकर्सच्या हातात असते. त्यामुळे यात त्यांचा काहीच संबंध नव्हता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *