Headlines

“मला वाद वाढवायचा नाही”, फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंचं विधान, कडू-राणा संघर्षावर आज पडदा पडणार?Mla Bachchu Kadu to meet Deputy Cm Devendra Fadanvis today commented on conficts with Ravi Rana

[ad_1]

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी केली. या आमदारांमधील वाद मिटला असल्याचं वाटत असतानाच दोन्ही आमदारांनी पुन्हा एकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यातच आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रवी राणांची आधी दिलगीरी मग चिथावणीखोर वक्तव्याबाबत पत्रकाराने प्रश्न विचारताच “पब्लिक है, पब्लिक जानती है” असे कडू यांनी म्हटले आहे. हा वाद वाढवायचा नसल्याचंही कडू यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. आभार मानायला उपमुख्यमंत्र्यांशी भेटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“कोणत्या चौकात…”, बच्चू कडू यांचा रवी राणांना प्रतिइशारा; म्हणाले, “मी मरण्यासाठी तयार”

“आपण चार पावलं मागे घेऊ, अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ. या वादात आपली ऊर्जा संपवू नका”, असं कार्यकर्त्यांना सांगितल्याचंही कडू म्हणाले आहेत. दरम्यान, मध्यस्थीला मान न देता पुन्हा विधानं करणं चुकीचं नाही का? असा प्रश्न पत्रकाराने कडू यांना विचारला. “यावर मला काहीच बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

विश्लेषण: बच्चू कडू, रवी राणांमधील संघर्ष नेमका काय आहे? त्याची बीजे कशी पेरली गेली?

“कुणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे,” असा इशारा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा यांनी कडू यांना दिला होता. “रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुल घेऊन तयार आहे. त्यांना माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहेत, त्यांनी सांगावे. मी हात सुद्धा लावणार नाही. त्यांनी तारीख सांगावी, मी मरण्यासाठी तयार राहतो. कोणत्या चौकात येऊ हे सुद्धा त्यांनी सांगावं”, असं प्रत्युत्तर कडू यांनी दिलं आहे. त्यानंतर आज कडू फडणवीसांची भेट घेत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *