Headlines

“मला कंटाळा आलाय, माझ्यासाठी…” मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग | woman officer molest by senior officer in ministry chitra wagh statement rmm 97

[ad_1]

मुंबईतील मंत्रालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं संबंधित विभागात काम करणाऱ्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. आरोपी अधिकाऱ्याने “मला कंटाळा आलाय माझ्यासाठी गाणं म्हणून दाखव” अशी मागणी पीडित महिला अधिकाऱ्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार आरोपी अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये घडला असून यावेळी विभागाचे उपसचिवही कॅबिनमध्ये उपस्थित होते.

या प्रकारानंतर पीडित महिला अधिकाऱ्याने संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. विधिमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उपसंचालक दर्जाच्या पदावर काम करतात. १८ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागातील अवर सचिव स्तरावरील पुरुष अधिकाऱ्याने पीडित महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. “मला बरं वाटत नाही, मला कंटाळा आला आहे. माझ्यासाठी गाणं म्हणून दाखव,’ अशा प्रकारची मागणी आरोपीनं केली आहे.

हेही वाचा- “…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

या घटनाक्रमानंतर भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संबंधित घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी पीडित महिला अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा केली. यानंतर त्यांनी संबंधित आरोपी अधिकाऱ्याची तत्काळ चौकशी करून त्याला निलंबित करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी विभागाच्या मंत्र्यांकडे केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. हे शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे. मुलींचा आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या आणि त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
ली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *