Headlines

aditya thackeray tweet after tata airbus safran project left maharashtra spb 94

[ad_1]

वेदान्त फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका़ सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी या दोन्ही प्रकल्पांचा थेट उल्लेख टाळत शिंदे सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा –‘सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी…”

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

”कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदारांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश आहे”

हेही वाचा – ‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

वेदान्त फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनीही आज पत्रकार परिषद घेत, ”एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. यावरून शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *