Headlines

KGF 3 teaser : रॉकीचा भूतकाळ उलगडणार, ‘केजीएफ 3’ च्या टीझरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

[ad_1]

KGF 3 Teaser : K.G.F या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं होतं. चित्रपट प्रदर्शित होताच थिएटरमध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवण्यापासून जल्लोष केला होता. गेल्या वर्षी 14 एप्रिल 2022 रोजी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF 2) प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण चित्रपटाच्या क्लायमॅक्सनं सगळ्यांची आतुरता वाढवत. ‘केजीएफ: चॅप्टर 3’ पाहण्याची उस्तुकता लावली होती. दरम्यान, काल यशच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असं म्हणालायला हरकत नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा रॉकी भाईच्या प्रवासाची सैर करून दाखवली आहे. ते पाहिल्यानंतर केजीएफ 3 येणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. 

‘केजीएफ 2’चा पोस्ट क्रेडिट सीन पाहून या चित्रपटाची टीम ‘केजीएफ 3’च्या तयारीत आहे असं समोर आलंच होतं. पण या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून या चित्रपटात पुढे काय होणार या विषयी प्रत्येक कलाकार हा विचार करत होता. पण काल प्रदर्शित झालेल्या या टीझरमुळे तिसऱ्या भागात आता काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता शिगेला गेली आहे. नक्की काय पाहायला मिळणार या गणितात सगळे अडकले आहेत. 1978 ते 1981 या वर्षात रॉकी कुठे होता? आणि काय करत होता हे आपल्याला ‘केजीएफ 3’ मध्ये पाहायला मिळणार असं या टीझरमधून दिसतं आहे.  हा टीझर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं, ‘सर्वात शक्तिशाली माणसाने पाळलेलं शक्तिशाली वचन…’

हा टीझर समोर आल्यानंतर KGF3 सगळीकडे ट्रेंड होऊ लागलं आहे. तर ट्विटरवर #KGF3 ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगनं चाहते ‘रॉकी भाई’ म्हणजेच यशचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी टीझरच्या शेवटच्या सीनचे स्क्रिन शॉर्ट शेअर करत कॅप्शन दिलं आहे की लवकरच येणार. तर एका नेटकऱ्यानं टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये असलेल्या डायलॉगचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. वचन हे पाळलं जाईल (That Promise Will Be Kept) असं म्हटलं आहे. तर यशच्या चाहत्यांचा दावा आहे की KGF 3 चा क्लायमॅक्स आजपर्यंतचा सर्वात स्फोटक असणार आहे, ज्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल.

हेही वाचा : ‘टायगर’च्या शूटिंगदरम्यान Salman Khan ला आवडले नव्हते कतरिना कैफचे कपडे, म्हणाला होता ‘छोटे होते आणि…’

दरम्यान, K.G.F चा हा टीझर 495k लोकांनी पाहिला आहे. तर आता यशला पुन्हा एकदा रॉकी भाईच्या भूमिकेत पाहता येणार या आशेन त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *