Headlines

केसरकरांना ‘अच्छे दिन’… थेट केंद्रात काम करण्याच्या संधीबद्दल म्हणाले, “जबाबदारी दिली तर नाही म्हणता येणार नाही, कारण…” | deepak kesarkar on opportunity of working at central government scsg 91

[ad_1]

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र असं असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात आज थेट दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये आपल्याला केंद्रात काम करण्यासंदर्भातील काही जबाबदारी दिली गेल्यास ती आपण नक्कीच स्वीकारु असं म्हटलंय.

मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये केसरकर यांना शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार २० जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर येतेय असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी तारखेबद्दल खुलासा केला नाही मात्र मुख्यमंत्री म्हटले म्हणजे लवकरच विस्तार होईल असं स्पष्ट केलं. पुढे याच मुद्द्यावरुन पत्रकाराने केसरकरांना केंद्रातील जबाबदारीसंदर्भातील चर्चांवरुन प्रश्न विचारला. कॅबिनेटचा विस्तार होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत. मात्र तुम्हाला केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते असी चर्चा आहे. तर तुम्ही केंद्रामध्ये जबाबदारी देण्यात आली तर स्वीकारण्यासाठी तयार आहात का? असा प्रश्न केसरकरांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर उत्तर देताना, “ही जबाबदारी खासदारांना देण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. शिवसेना बऱ्याच काळापासून एनडीएचा सदस्य राहिला आहे. शिवसेनेचे खासदार चार ते पाच वेळा निवडून आले आहेत,” असं केसरकर म्हणाले. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपल्याला यासंदर्भात विचारणा झाली तर आपण ती जबाबदारी नाकारणार नाही असंही सांगितलं. “कोणी जर जबाबदारी दिली तर नाही म्हणता येणार नाही. कारण जे लोक आपल्यावर जबाबदारी देतात ते फार मोठे लोक असतात. त्यांना नाही म्हणता येत नाही,” असं केसरकर म्हणाले. त्यामुळे सर्व काही जुळून आलं आणि केसरकरांना केंद्रामध्ये जबाबदारी सोपवण्यात आली तर सिंधुदुर्गचे आमदार मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे.

“जबाबदारी नाकारता येत नसली तरी मला मात्र असं वाटतं की जे आमचे खासदार आहेत त्यांच्याकडे फार कौशल्य आहे. ते चांगलं काम करु शकतात. शिवसेनेनं पुन्हा एनडीएचा सदस्य व्हायला हवं. जे राज्यात झालं ते राष्ट्रीय स्तरावरही झालं पाहिजे असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. असं झालं तर आम्हाला सर्वांना आनंद होईल. २५ वर्षांपासून मित्रपक्ष असणारे पक्ष एकत्र येऊन भारताच्या विकासात सहकार्य देत असतील तर सामाधानाची बाब आहे,” असं केसरकर म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *