Headlines

“ज्यांनी शिवसेना फोडली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यांच्या…”; तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल | ShivSena leader Sanjay Raut gets bail in money laundering case slams CM Eknath Shinde And Group After released from jail scsg 91

[ad_1]

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. तर दुसरीकडे राऊत यांना जामीन देण्याच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दुहेरी तडाखा मिळाला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने ऑर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा मुक्तता करण्यात आली. तेव्हा शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करून मिरवणूकही काढली. या मिरवणूकीनंतर राऊत यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लागवला. “ज्यांनी शिवसेना तोडली, फोडली,” असा उल्लेख करत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.

“न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरविली आहे. आम्ही लढणारे आहोत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी सुटकेनंतर व्यक्त केली आहे. त्यानंतर आपल्या घरासमोर केलेल्या भाषणामध्ये राऊत यांनी, “या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल तो आपल्या शिवसेनेचा होईल,” असा विश्वास व्यक्त केला. “माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो आ जाऐगी सरकार,” असं राऊत म्हणाले.

“आता खोक्यांवरुन बदनामी करतायत म्हणे. लोक कोर्टात जाणार आहेत खोक्यांवर बोलायला. महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसलेले आहेत,” असा टोला राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओकेची घोषणाबाजी केल्यानंतर राऊत यांनी, “आता ओके फक्त शिवसेनाच. ती पण फक्त आपल्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी. फक्त बाळासाहेब ठाकरेंची,” असं हात उंच करुन सांगितलं. “गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही,” असा टोलाही त्यांनी लागवला.

“मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडलीय लक्षात घ्या. पण असं होणार नाही,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. “हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठीचं आहे. बाकी कोणासाठी नाही. ते दाखवण्यासाठी तुम्ही इथं आलात. तुम्ही मला प्रेम दिलं त्यासाठी मी तुमचा आभारी आहे,” असं राऊत म्हणाले. “ज्यांनी शिवसेना तोडली, फोडली. आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. शिवसेना हे नाव गोठवण्याचा प्रयत्न केला आणि तो अजूनही सुरु आहे. त्यांच्या (हे सारं करणाऱ्यांच्या) छाताडावर बसून शिवसेनेचं तेच तेज, तेच वैभव आणि ताकद आकाशाला गवणसी घालणारी असेल,”

“माझ्या अटकेनं सुरुवात झाली. आता मी सुटलेलो आहे. आता सुसाट सुटायचं,” असं सूचक विधान राऊत यांनी केलं. “मी अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम केले आहे. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे भगवा फडकत असून तो यापुढेही फडकत राहील. त्याला हात घालण्याचा प्रयत्न जे करतील, त्यांचे हात जळून जातील. आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मशाल आहे,” असे राऊत यांनी सांगितले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *