Headlines

‘नाद नाही करायचा!’, अफजलखानाच्या कबरीजवळील बांधकामावर कारवाई करताच नितेश राणेंचं ट्वीट | BJP Nitesh Rane on Illegal Construction Removed from Pratapgarh in Satara sgy 87

[ad_1]

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. चोख पोलीस बंदोबस्तात आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस तैनात आहेत. दरम्यान भाजपा नेते नितेश राणे यांनी या कारवाईवरुन आनंद व्यक्त केला असून ‘नाद करायचा नाही’ अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

“अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवले!!! महाराष्ट्रात हिंदुत्वादी सरकार आहे. नाद नाही करायचा,” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमीची प्रतापगडाच्या पायथ्य़ाशी अफजलखानाच्या कबरीजवळ जे अनधिकृत बांधकाम उभारण्यात आलं आहे ते हटवण्यात यावं अशी मागणी होती. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानतंरही कोणत्याही सरकारची कारवाई हिंमत होत नव्हती. पण आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. या सरकारने आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास दिला आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रीमंडळाचं यांचे आभार मानतो”.

अशा प्रकारची इतर अतीक्रमणंही अशाप्रकारे हटवली जातील अशी अपेक्षाही नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होते. तेथे उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती.

आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीलगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *