Headlines

मालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद…सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

[ad_1]

Janhvi Kapoor Maldive Photo: अभिनेत्री जान्हवी कपूरने (janhavi kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये (bollywood) आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (star kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जान्हवी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर (social media) फोटो पोस्ट करत असते…
 
जान्हवी कपूर तिच्या फॅशन स्टेट्मेंट्साठीसुद्धा  (fashion) ओळखली जाते, तिच्या बॉडी टाईपनुसार जान्हवी वेगवेगळी फॅशन कॅरी करत असते, तिने केलेली फॅशन आणि स्टयलिश कपडे तिच्यावर फार सुंदर दिसतात आणि ती ते परफेक्ट कॅरी सुद्धा करते. 

जान्हवी नुकतेच मालदिव व्हेकेशन (maldives vacation) एन्जॉय करून आलीये आणि त्याचे सुंदर फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत तिच्या या फोटोना भरपूर लाईक्स येत आहेत तिच्या चाहत्यांकडून तिचे फोटो खूप पसंत केले जातात. 

जान्हवीने या फोटोंमध्ये जे कपडे घातलेत ते पाहून सोशल मीडियावर वातावरण खूपच तापलं आहे, मालदीव च्या समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनी घालून पोझ देत जान्हवीने एकपेक्षा एक सुंदर फोटो काढले आहेत. 

जान्हवीने जे फोटो शेअर केले आहेत त्यात तिने निऑन रंगाची बिकिनी (bikini) घातली आहे यात ती कमालीची हॉट दिसतीये, तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वजण घायाळ झालेत हे नक्की… 

जान्हवी या निऑन कलरच्या टू पीस सेटमध्ये आपली कर्वी फिगर दाखवताना दिसत आहे. रिलॅक्स मूडमध्ये केस मोकळे सोडून नो मेकअप लूकमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसतेय. 

तर दुसऱ्या लूकमध्ये जान्हवीने फ्लोरल मोनोकीनी परिधान केली आहे, सर्वांच्या नजर तिच्या या ड्रेसवर खिळल्या आहेत… लाइट ग्रीन रंगाच्या बीच स्वीमसूटवर (swimsuit) पिवळ्या , निळ्या रेड आणि पिंक रंगाच्या शेड्समध्ये फ्लॉवर डिझाइन्स आहेत ज्या ड्रेसला आणखी सुंदर बनवत आहेत. 

हेही वाचा : Ram Gopal Varma चं चाललंय काय? आधी अभिनेत्रीच्या पायाला Kiss, आता अप्सरा राणीसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल

एकूणच काय तर जान्हवीने आपल्या वेकेशनमध्ये भरपूर मजा मस्ती केल्याचं दिसत आहे त्याचसोबत ती फॅशन करायला बिलकुल विसरली नाहीये  सध्या तरी सोशल मीडियावर  जान्हवीच्या लूकची खूप चर्चा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *