Headlines

Shivnarine Chanderpaul च्या डोळ्यांखाली का लावायचा डार्क स्टिकर?

[ad_1]

Shivnarine Chanderpaul black sticker : वेस्टइंडिज टीमचा (West Indies cricket team) महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul)ची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. विरूद्ध टीमला चंद्रपॉल या खेळाडूची विकेट काढायची म्हटली की, बऱ्याच योजना आखाव्या लागायच्या. खासकरून टेस्ट सामन्यामध्ये चंद्रपॉलचा स्वॅग काही वेगळाच होता. शिवनारायण चंद्रपॉलने त्याच्या टेस्ट करियरमध्ये 280 डाव खेळले असून 27,000 हून अधिक बॉल्सचा सामना केला. केवळ वेस्ट इंडिजमध्येच नाही तर इतर देशामध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. त्याची असलेली एक वेगळी स्टाईल नेहमीचं चाहत्यांना भावली.

याशिवाय शिवनारायण चंद्रपॉलबाबत असलेली अजून एक खास गोष्ट म्हणजे, त्याचया डोळ्यांखाली असलेला तो डार्क स्टिकर (dark stickers under eyes). अनेक क्रिकेटर किंवा चाहते, यांच्या मनात घुटमळणारा अजून एक प्रश्न म्हणजे, चंद्रपॉल असं का करायचा?

डार्क स्टिकर (dark sticker) नेमकी कहाणी काय?

शिवनारायण चंद्रपॉल असं करण्यामागे एक मोठी आणि रंजक कहाणी आहे. चंद्रपॉल त्याच्या डोळ्यांच्या खाली असा युनीक स्टिकर लावायचा कारण, त्याच्या डोळ्यांवर थेट सूर्यकिरणं पडू नये म्हणून. याला एंटी -ग्लेअर स्टिकर म्हटलं जातं. हा स्टिकर उन्हामध्ये खेळाना डोळ्यांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांना कमी करायचा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हा एक असा स्टिकर आहे, जो सनग्लासेस सारखं काम करतो.

शिवनारायण चंद्रपॉल याने सांगितलं होतं की, या स्टिकरमुळे सूर्याची किरणांचा जास्त प्रभाव डोळ्यांवर पडत नाही. यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने फलंदाजी आणि फिल्डींग योग्य पद्धतीने करू शकता. 16 ऑगस्ट 1974 मध्ये जन्मलेला शिवनारायण चंद्रपॉल हा मूळचा भारतीय आहे. 1873 मध्ये पवनकुमार चंद्रपाल हे शिवनारायण चंद्रपॉलच्या पूर्वजांपैकी एक होते. हे बिहारमधील पूर्णिया या ठिकाणाहून गयानाला गेले होते.

नुकतंच मुलाने केलं डेब्यू

शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल याने नुकतंच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये डेब्यू केलं आहे. तेजनारायण चंद्रपॉलने पहिल्या टेस्ट सामन्यात चांगली फलंदाजी करत सर्वांना त्याच्या वडिलांची आठवण करून दिली आहे. शिवनारायण चंद्रपॉलने 164 टेस्ट आणि 268 वनडे सामने खेळले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *