Headlines

IND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; ‘हिटमॅनचे’ 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल

[ad_1]

IND vs NZ 2nd T20I : टी -20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतरही सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट तळपत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही सूर्यकुमारचा उत्कृष्ट फॉर्म पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावले. सूर्याने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर एकूण 51 चेंडूत 111 धावांची खेळी खेळली. सूर्यकुमारने 50 धावा 33 चेंडूत पूर्ण केल्या, त्यानंतर पुढील 50 धावा  अवघ्या 16 चेंडूत पूर्ण केल्या. संपूर्ण खेळीदरम्यान सूर्याने तब्बल 11 चौकार तर 7 षटकार मारले.

रोहितच्या विक्रमाची बरोबरी

न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकून सूर्यकुमार यादवने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खास विक्रमाची बरोबरी केलीय. एकाच वर्षात दोन टी-20 शतके ठोकणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2018 मध्ये रोहित शर्माने हा पराक्रम केला होता. सूर्यकुमारचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे शतक आहे. याआधी सूर्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने 48 चेंडूत शतक झळकावले होते.

हे ही वाचा >>  इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav

 

रोहितची भविष्यवाणी ठरली खरी

सूर्याच्या या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यादरम्यान रोहित शर्माचेही 11 वर्षांपूर्वीचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये रोहितने सूर्यकुमार यादवबद्दल भाकीत केले की तो भविष्यात दमदार  खेळाडू असेल. “चेन्नईमध्ये नुकतेच बीसीसीआय अवॉर्ड्स संपले. काही रोमांचक क्रिकेटपटू येत आहेत. भविष्यात मुंबईतील सूर्यकुमार यादव याच्याकडे लक्ष द्यावे लागेल,” असे रोहितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 10 डिसेंबर 2011 रोजी, रोहितने हे ट्विट केले होते.

हे ही वाचा >>  सुर्यकुमार यादव ठरला ‘विराट’ विक्रमाधीश! कोहलीचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड मोडला

रोहितचे हेच ट्विट राजस्थान रॉयल्सने (RR) रिट्विट केले आहे, तर अनेक चाहत्यांनी रोहित शर्माला दूरदर्शी म्हटले आहे. एका क्रिकेट चाहत्याने रोहितला याची माहिती होती असे म्हटले आहे. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सूर्यकुमारच्या दमदार शतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 191 धावा केल्या. इशान किशनने 31 चेंडूत 36, पंतने 13 चेंडूत 6, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याने 13-13 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन विकेट घेतल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *