Headlines

कुशल बद्रिकेच्या आयुष्यातून ‘तो’ हरवला; म्हणाला, ‘…कळल्यापासून त्रास होतोय’

[ad_1]

Kushal Badrike Pen Drive Post: कुशल बद्रिके याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. गेली दहा वर्ष तो आपल्याला ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. त्यातून त्यानं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून आणि मराठी मालिकांतूनही कामं केली आहेत. त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. मालिका, चित्रपट आणि जाहिरात, वेबसिरिज यातूनही त्यानं कामं केली आहेत. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट या अनेकदा चर्चेत असतात. सध्या त्याची अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. याखाली नेटकरीही कमेंट्स करताना दिसत आहेत. यंदा त्याची ही भावूक पोस्ट नेटकऱ्यांच्या नजरेस पडली आहे. यावेळी त्यांच्या चाहत्यांनीही याखाली भावूक कमेंट्स केल्या आहेत. 

कुशलचं काहीतरी हरवलंय. ज्याच्यामुळे त्याचे चाहतेही काळजीत पडले आहेत. खरंतर कुठलीही गोष्ट ही आपल्यासाठी फारच स्पेशल असते. त्यामुळे ती हरवली की आपणही फार चलबिचल होऊन जातो. त्यातून अशावेळी आपल्याला आपण काय करावं हेही कळतं नाही. कुठेतरी व्यक्त व्हावं इतकंच वाटतं. अशीच काहीशी अवस्था ही अभिनेता कुशल बद्रिके याची झाली आहे. त्यासाठी त्यानंही आपली ही चलबिचलता सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. यावेळी त्यानं आपल्या कोणत्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यावर त्याच्या चाहत्यांनीही काय काय कमेंट्स केल्या आहेत याची जोरात चर्चा रंगलेली आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की त्यानं या पोस्टमध्ये नक्की लिहिलंय तरी काय? 

हेही वाचा : ग्नाविषयी मित्रांनीच भरले कान अन् आजन्म अविवाहित; ज्येष्ठ अभिनेत्याची अधुरी प्रेम कहाणी

कुशलनं यावेळी आपला एक पोस्ट शेअर केला आहे जो काहीसा गंभीर आहे आणि थोडा इमोशनलही आहे. यावेळी त्याचे एक पेन ड्राईव्ह हरवले आहे. सोबतच त्यात त्याचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज होते. तो म्हणतो, ”माझं सालं एक pen drive हरवलंय काही photos आणि videos असलेलं, तसं रोजचं वापरात नव्हतं म्हणा ते, पण हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय.
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते बघा अचानक हरवते आणि सापडता सापडत नाही, तसं काहीसं हरवलय “आठवणींनी भरलेलं…” (सुकून)”

सध्या त्याच्या या पोस्टखाली नानाविध आणि संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं कमेंट केली आहे की, ”एका पेनड्राईव मधील फोटो आणि व्हिडिओ बाबत तू एवढा संवेदनशील आहेस तर रिअल लाईफ मध्ये कसा असशील?” तर दुसऱ्यानं  लिहिलंय की, ”हो साधा रुमाल हरवला तरी आपल्याला किती चुटपुट, पेन draive नवीन घेता येईल पण जुन्या आठवणी त्या कश्या आणणार. सुकून.” अशाच एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की, ”तुम्ही addition मस्त करता.असा एक दिवस नसेल माझ्या आयुष्यात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची आठवण आली नसेल किंवा तुमचा एखादा act बघितला नसेल.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *