Headlines

उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा…

[ad_1]

Hritik Roshan Son: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनची. काल तो आणि सबा आझाद हे डिनर डेटला गेले होते. त्यावेळी त्यांच्या हृतिकची दोन मुलंही स्पॉट झाली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी हृतिकची दोन्ही मुलं ही इतकी मोठी झालेली पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सबा आझादसोबत हृतिक रोशन रिलेशनशिपमध्ये आहे. 2014 साली हृतिक रोशन आणि सुझॅन खानचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते दोघं विभक्त झाले आणि मुलं ही हृतिककडे राहिली.

त्यानंतर हृतिक आणि सुझॅनही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले पाहायला मिळाले होते. आपल्या मुलांसाठीही ते एकत्र येताना दिसतात. कंगना राणावतसोबतच्या ब्रेकअपनंतर हृतिक रोशन बरेच दिवस सिंगल होता आणि आता तो सबा आझादला डेट करतो आहे. यावेळी सबा आझाद, हृतिक रोशन आणि त्याची दोन्ही मुलंही स्पॉट झाली होती. 

सध्या हृतिकची मुलं ही फार मोठी झाली आहेत. परंतु यावेळी सर्वांचेच लक्ष होते ते म्हणजे हृतिकच्या मोठ्या मुलाकडे. ह्रिहान रोशन आणि हृधन रोशन अशी दोन मुलं हृतिक रोशनला आहेत. हृधनचा जन्म 2008 साली झाला असून ह्रिहान रोशनचा जन्म 2006 साली झाला आहे. त्यामुळे त्याची मुलं ही 17 आणि 15 वर्षांची आहेत. आपल्याला एवढी मोठीमोठी मुलं असताना हृतिक रोशन हा आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान सबा आझादला डेट करतो आहे. त्यामुळे सबा आझाद आणि हृतिक रोशनला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येते. हृतिक रोशन आणि सबा आझाद हे अनेकदा परदेशवारीवर असतात. काही दिवसांपुर्वीही ते परदेशात दोघे फिरायला गेले होते. त्याचसोबत त्यांनी आपले हे फोटो सोशल मीडियावर पोस्टही केले होते. त्यांच्या फोटोंचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. अर्जेटिनाला ते दोघं गेले होते. 

हेही वाचा : पत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं

यावेळी सबा आझाद आणि हृतिक रोशन सोबत हृतिकची दोन्ही मुलंही डिनर डेटला आली होती. सतरा वर्षांच्या ह्रिहान रोशनला पाहुन नेटकरी फार शॉक झाले. हृतिकच्या लहान मुलांची कायमच चर्चा रंगलेली असायची ती म्हणजे त्यांना लहान पाहून चाहते कायमच त्यांचे कौतुक करायचे. आता त्याला इतकं मोठं झालेले पाहून चाहते अवाक झाले आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *