Headlines

बॉलिवूडचा ओरिजनल चॉकलेट बॉय, पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चनशी पंगा घेणारा हाच तो!

[ad_1]

Rishi Kapoor Birthday : बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचा आज 4 सप्टेंबर जन्म दिन आहे. 1952 साली त्यांच्या बॉलिवूडमधील कपूर खानदानात त्यांचा जन्म झाला होता. ऋषी कपूर यांनी त्यांच्या आयुष्यातील जवळपास 20-21  करिअरला दिली. त्यांच्या निधनानं फक्त चाहते आणि कुटुंब नाही तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना बॉलिवूडचे चॉकलेट बॉय अशी ओळख मिळाली होती. ऋषी कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. 

ऋषी कपूर हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींविषयी जाणून घेऊया. त्यापैकी एक म्हणजे ऋषी कपूर यांच्या एका गोष्टीवरून अमिताभ बच्चन रागावले होते. ऋषी कपूर यांनी पैसे देऊन एक अवॉर्ड खरेदी केला पण अमिताभ यांना वाटलं की अवॉर्डचे खरे मानकरी हे ते होते. त्यामुळे ते नाराज होते. 

ऋषी कपूरनं स्वत: याविषयी सांगितलं की त्यांचा पहिला चित्रपट हा बॉबीसाठी स्वत: ला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला होता. मिळवून घेतला कसा? खरंतर ऋषी कपूर यांनी स्वत: हा अवॉर्ड खरेदी केला होता. 1973 मध्ये त्याच वर्षी अमिताभ यांचा जंजीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांना वाटलं होतं की जंजीरसाठी त्यांना अॅवॉर्ड मिळायला हवा होता. त्यामुळेच ते नाराज होते. 

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला: ऋषि कपूर अनसेंसर्ड’ मध्ये 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या कभी-कभीच्या सेटवर त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्यात असलेल्या कोल्ड वॉरविषयी सांगितं लिहिलं होतं की मला वाटलं की अमिताभ नाराज आहेत कारण मला बॉबीसाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. मला खात्री आहे की त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या जंजीरसाठी त्यांना हा पुरस्कार मिळायला योग्य वाटला. हे सांगायला मला लाज वाटते, पण प्रत्यक्षात मी तो पुरस्कार ‘खरेदी’ केला. त्यावेळी मी इंडस्ट्रीत अगदी नवीन होतो. तारकनाथ गांधी हे पीआर होते, ते म्हणाले होते, ‘महाराज, तुम्ही तीस हजार दिले तर मी तुम्हाला पुरस्कार देईन. मी फारसा फेरफार करणारा माणूस नाही पण त्यावेळी मी विचार न करता त्याला पैसे दिले.

हेही वाचा : रविवार सनीसाठी पुन्हा लकी ठरला! ‘गदर 2’ नं ओलांडला 600 कोटींचा टप्पा; ‘बाहुबली-2’लाही धोपीपछाड

हे पुस्तक आल्यानंतर अनेकांनी ऋषी कपूर यांना मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्डबद्दल बोलत होते. दिवंगत अभिनेत्याने त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी फिल्मफेअर पुरस्कार लिहिला नाही. मी कोणाचेही नाव सांगितले नाही. मी म्हणालो की मी ‘एक पुरस्कार’ विकत घेतला आहे. मला विचारण्या आलं की तुला हा पुरस्कार पाहिजे का?’ आणि मी म्हणालो, ‘हो, नक्कीच,’ आणि मग समोरची व्यक्ती म्हणाली की, ‘तुला 30 हजार रुपये मोजावे लागतील.’ त्यावेळी तीस हजार रुपये खूप मोठी रक्कम होती. म्हणून मी म्हणालो का नाही. ते त्याच्या खिशात गेले की नाही हे मला माहीत नाही पण मी एका माणसाला इतके पैसे दिले आहेत.

ऋषी कपूर हे सगळ्यात शेवटी वायआरएफच्या डॉक्यू-सीरीज द रोमांटिक्समध्ये पाहिलं होतं. यासाठी त्यांनी निधनाच्या एक महिना आधी शूट केलं होतं. चार एपिसोडमध्ये प्रदर्शित झालेली ही डॉक्यूमेंट्री या वर्षाच्या सुरुवातीला 14 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *