Headlines

करायला गेली एक झालं भलतच… आयेशा टाकियाचा बदलेला चेहरा पाहून चाहत्यांना धक्का

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. आयशा टाकियाला बॉलीवूडमध्ये वाँडेड गर्ल आणि बबली गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. आयशा टाकिया जेव्हा ‘टारझन: द वंडर कार’ या चित्रपटात दिसली होती. तेव्हा तिच्या क्यूटनेसने लोक घायाळ झाले होते. यानंतर ती सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटात दिसली आणि या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीने 2009 मध्ये तिचा बॉयफ्रेंड फरहान आझमीसोबत मुंबईत लग्न केलं.

आयशाने बालकलाकार म्हणून काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यानंतर त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. आयशा तिच्या फिगरमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. या चित्रपटानंतर तिला सिनेमाच्या खूप ऑफर्स येऊ लागल्या. आयशा टाकियाचा लूक गेल्या काही वर्षांत खूप बदलला आहे आणि तिच्या चाहत्यांना हे चांगलेच ठाऊक आहे. सध्या सोशल मीडियावर आयशाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लूक बदललेला दिसत आहे.

आयेशाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे तिचा चेहरा विचित्र झाला होता. एवढंच नाही तर शस्त्रक्रियेनंतर तिचे ओठ इतके सुजले होते की तिला ओळखणं कठीण झालं होतं. मात्र, आयशाने नेहमीच सांगितले आहे की, तिच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. समोर आलेल्या या फोटोंमध्ये आयशाला ओळखणे कठीण झाले होतं. या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्याचा लूक पूर्णपणे वेगळा होता आणि शरीरही खूप विचित्र दिसत होतं.

तिने सिलिकॉन इम्प्लांट करून तिच्या स्तनाचा आकारही वाढवला आहे. असं सोशल मीडियावर बोललं जात होतं. जेव्हा ती एका कार्यक्रमात पोहोचली तेव्हा लोकांनी तिच्या शरीरावर कमेंट केली. पण आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याची ही केवळ अफवा होती असं ती नेहमी सांगायची.

जेव्हा आयशा टाकियाच्या ओठांच्या शस्त्रक्रियेची चर्चा रंगली तेव्हा तिने एका मुलाखतीत सांगितलं की, तिने कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. तिच्‍या सुजलेल्‍या ओठांचे जे व्‍हायरल होत असलेले फोटो होते  ते फोटोशॉप केलेले आहेत.

अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचं झालं तर, आयशा टाकियाने टार्झन द वंडर कारमधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला पुरस्कारही मिळाला होता. आयशाने बॉलिवूडशिवाय तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘सुपर’ या तेलुगू चित्रपटासाठी आयशाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठीही नामांकन मिळालं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *