Headlines

‘ही’ ठरली करिअरमधील मोठी चूक, Dino Morea चा मोठा खुलासा

[ad_1]

Dino Morea Talkes On Doing Films for Money : बॉलिवूड कलाकार हे कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. सगळ्याच कलाकारांना नेहमीच चांगलेच चित्रपट मिळतात असं नाही. तर काही कलाकारांना त्यांना मिळालेली लोकप्रियता ही टिकवता येते असं नाही. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) आहे. डिनोला खरी लोकप्रियता ही ‘राझ’ या हॉरर चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात डिनो आणि बिपाशा एकत्र दिसले होते. त्या दोघांमध्ये असलेल्या केमिस्ट्रीनं सगळ्यांना वेड लावलं होतं. त्यानंतर एक काळ असा आला की डिनो हा पडद्यापासून लांब झाला. त्याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिनोनं खुलासा केला आहे. 

डिनोनं नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत डिनोनं त्याच्या करिअरमध्ये आलेल्या उतरत्या काळाविषयी सांगितले. तर या संपूर्ण प्रकरणासाठी तो स्वतः कारणीभूत असल्याचं त्यानं सांगितलं. ‘पैसे कमावण्याच्या प्रयत्नात डिनोनं अशा काही गोष्टी केल्या ज्या त्यानं करायला नको होत्या किंवा ज्या गोष्टींना त्यानं होकार दिला त्याचा करिअरवर कसा परिणाम झाला.’ (Dino Morea On Doing Films for money)

डिनो यावेळी म्हणाला, ‘माझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी पैशाला खूप महत्त्व दिलं. पैसे कमावण्याच्या प्रयत्नात राहिलो. त्यामुळे माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअर मागे राहिलं. मला पैशांचा हव्यास नव्हता, पण तेव्हा मला पैशांची गरज होती. मला स्वत: चं एक घर खरेदी करायचं होतं. त्यामुळे मी चित्रपट निवडताना कोणताही विचार केला नाही.’   

हेही वाचा : सततच्या धमक्या पाहता Salman Khan चा मोठा निर्णय, कलाजगताच्या वळल्या नजरा

पुढे डिनो म्हणाला, ‘बिपाशा बासुसोबत (Bipasha Basu) मी काही चित्रपट केले पण आम्ही चित्रपटासाठी चर्चेत नव्हतो. तर आमचा ब्रेकअप झाला, तरी आमच्यातील केमिस्ट्री कशी आहे, अजून आम्ही मित्र कसे हे सगळे प्रश्न उपस्थित होते. मला याची जाणीव झाली की हे सगळं माझ्या कामाचा एक भाग आहे, पण याविषयी मला खूप उशिरा कळलं. त्याचा माझ्यावर परिणाम झाला कारण मला नेहमीच माझं खाजगी आयुष्य हे खाजगी ठेवायचे होते.’ 

दरम्यान, डिनोच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर आता डिनो हा चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये दिसत आहे. डिनो हा ‘द एंपायर’ या वेबसीरिजमध्ये दिसला. त्याच्या या कामाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *