Headlines

देशमुख – खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस

[ad_1]

Arpita Khan Celebrated Riteish Deshmukh’s Son’s Birthday : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या धाकटा लेक राहिलचा काल म्हणजेच 1 जून रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं रितेश आणि त्याची पत्नी जिनिलियानं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी रितेशच्या घरी हजेरी लावली होती. दुसरीकडे  राहिलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खाननं स्पेशल केक मागवत त्याच्या वाढदिवस साजरा केला. 

राहिलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अर्पिता खाननं एक छोट्या पार्टीचे आयोजन केले होते. राहिलला फुटबॉट हा खेळ प्रचंड आवडत असून त्याचा आवडता खेळाडू मेस्सी आहे. ते पाहता अर्पितानं राहिलसाठी स्पेशल फुटबॉलचा केक मागवला होता. त्याचे काही फोटो रितेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Arpita Khan Celebrated Riteish Deshmukh s Son s Birthday post viral

राहिलच्या वाढदिवसासाठी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये रितेशनं अर्पिताचे आभार मानले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अर्पिता केकवर मेणबत्ती लावताना दिसत आहे. अशात राहिल हा इतका मोठा आणि तो देखील फुटबॉलचा केक पाहून आनंदी झाला. हे पोस्ट शेअर करत रितेश अर्पिताचे आभार मानत म्हणाला, “राहिलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्पिता मावशीवर विश्वास ठेवणं, हा उत्तम पर्याय आहे”.

दरम्यान, रितेशनं राहिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रितेशचा मुलगा गुपचूप काही बोलताना दिसत आहेत. तर त्याचा मुलगा सांगतो की आता एक नवीन स्पायडर मॅन आला आहे. त्या व्हिडीओमध्ये राहिलला स्पायडर मॅन म्हणून दाखवले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांना देखील आनंद झाला आहे. रितेशनं हा व्हिडीओ लॉकडाऊनमध्ये असताना शूट केला होता, असे देखील त्यानं शेवटी सांगितले आहे. रितेशनं शेअर केलेला या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राहिलला शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : Kareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान… शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा

रितेशच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यानं 2012 साली त्याची सहकलाकार जिनिलियाशी मराठी परंपरेनं लग्न केले. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय असून त्यांचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांचे मजेशीर व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकरी नेहमीच उत्सुक असतात. इतकंच नाही तर रितेश आणि जिनिलियानं त्यांच्या दोन्ही मुलांना किती चांगले संस्कार दिले आहे असे म्हणत नेहमीच त्यांची स्तुती करण्यात येते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *