Headlines

आई-लेकीची क्यूट Moment कॅमेऱ्यात कैद, आलियासह राहा कपूर स्पॉट

[ad_1]

Alia Bhatt and Raha Kapoor Spotted: आलिया भट्ट ही अनेकदा विविध कारणांमुळे स्पॉट होत असते. मध्यंतरी आपल्या नव्या घराच्या ठिकाणी ती स्पॉट झाली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगली होती. मागील वर्षी 14 एप्रिलला आलिया आणि रणबीरचे लग्न झाले. त्यानंतर ते दोघं बरेच चर्चेत आले होते. त्यामुळे आलिया आणि रणबीरच्या (Alia and Ranbir) फॅन्सही त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर जून महिन्यात म्हणजे बरोबर एका वर्षापुर्वी आलिया आणि रणबीरनं आपल्या होणाऱ्या बाळाची बातमीही जाहीर केली होती. त्यामुळे त्यानंतर त्या दोघांची विशेष चर्चा झाली होती. त्यानंतर आलिया अनेकदा आपल्या प्रेग्नन्सीच्यावेळी स्पॉट झाली होती. आता आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर ती अनेकदा स्पॉट होते आहे परंतु तिनं अद्यापही आपल्या लेकीचा फोटो शेअर केलेला नाही. 

मध्यंतरी रणबीर कपूर आपली लेक राहा कपूरसोबत स्पॉट झाला होता. यावेळी राहा रणबीरच्या कडेवर झोपली होती. यावेळी तिचा हा व्हिडीओ स्पॉट झाला होता. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्याआधी आलिया, रणबीर आपल्या लेकीसह स्पॉट झाले होते. आता पुन्हा एकदा आलिया राहासह स्पॉट झाली आहे. यावेळी या व्हिडीओमध्ये (Raha Kapoor Video) आलिया ही गाडीतून उतरताना दिसते आहे. परंतु यावेळी ती आपल्या लेकीला ती भराभर गेऊन जाताना दिसली आणि यावेळी ती आपल्या लेकीसह दिसली. 

हेही वाचा – महाभारत फेम ‘शकूनी मामा’ रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

आलियाच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे आलिया आणि तिची कुटुंबिय सध्या दु:खात आहेत. आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कार झाले आहेत. तिथूनच परत येताना ती आणि राहा एकत्र स्पॉट झाले होते. सध्या तिचा हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यावेळी आलिया इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टचीही सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे. आलियाचा ‘रॉक और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट येतो आहे. यावर्षी जूलैमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

या चित्रपटातून जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र असे दिग्गजही आहेत. रणवीर सिंगसह आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहेत. आलियाचा आणि रणवीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *