Headlines

deputy chief minister Devendra fadanvis commented on kalyan loksabha seat of shrikant shinde

[ad_1]

राज्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर भाजपा दावा करणार का? अशा आशयाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांच्या जागांवर आम्ही का दावा करू? असा सवाल करत फडणवीसांनी या जागेवर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

SC on Maharashtra Political Crisis : धनुष्यबाण कोणाचं, शिंदे की ठाकरे? निवडणूक आयोगातील प्रकरणात SC कडून पुढची तारीख, त्याच दिवशी देणार निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उर्वरित शिवसेनेच्या जागांबाबतचा निर्णय शिंदे आणि भाजपा एकत्र घेईल, असे फडणवीस पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. भाजपाकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. ज्या मतदारसंघावर भाजपाचा प्रभाव नाही, अशा लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.

शाहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “ती जमीन दाखवल्यानंतर…”; दोन शब्दांत शिंदे गटालाही टोला

दरम्यान, भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा करणार आहेत, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी दिली आहे. या मतदारसंघात भाजपाचा एक मोठा मतदार वर्ग आहे. या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचेही या भागात मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी काळात या जागेवर भाजपा दावा करणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *