Headlines

बाळाच्या जन्माआधीच Ranbir-Alia पुढे अडचणी, मंदीरातही प्रवेश मिळेना, असं झालं तरी काय?

[ad_1]

मुंबई : अभिनेता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता (Ranbir Kapoor) सध्या  ‘ब्रह्मास्त्र’  सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शनापुर्वी महाकालाच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही होता. महाकालच्या दर्शनासाठी आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमला तेथे विरोधाला सामोरं जावं लागलं. यावेळी आंदोलक काळे झेंडे घेऊन महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि त्यांचा विरोध केला. स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाकाल मंदिराबाहेरील बिघडलेल्या वातावरणामुळे अयान मुखर्जी ( ayan Mukherji) महाकालच्या दर्शनासाठी आणि संध्याकाळच्या आरतीसाठी एकटाच पोहोचला. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यात फक्त अयान मुखर्जी संध्या आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहे.

दर्शनानंतर बाहेर आलेल्या अयान मुखर्जीनेही मीडियाशी संवाद साधला आणि सांगितले की, मझा चित्रपट यशस्वी व्हावा, अशी माझी इच्छा आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात जाऊ शकले नसल्याचं सांगण्यात येत आहे.  (boycott Alia Bhatt)

महत्त्वाचं म्हणजे रणबीरच्या एका जुन्या वक्तव्यामुळे अभिनेत्याला विरोधाचा सामना करावा लागत आहे. रणबीर कपूरने सांगितले होते की, त्याला बीफ आवडतं आणि तो बीफप्रेमी आहे. अभिनेत्याच्या या वक्तव्यमुळे सध्या वातावरण तापलं आहे.  (boycott Ranbir Kapoor)

दरम्यान, बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक सिनेमांनी प्रदर्शनापूर्वी बॉयकॉटचा सामना केला आहे. आता ‘ब्रह्मास्त्र’ बॉयकॉटच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा 9 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता ब्रह्मास्त्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) किती कोटींपर्यंत मजल मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलिया आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *