Headlines

‘देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन…’, फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

[ad_1]

Ameya Khopkar Is Against Theater Release Of The Legend Of Maula Jatt In India : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला फक्त पाकिस्तानमध्ये नाही तर परदेशातही पसंती मिळाली आहे. चित्रपटानं जागतिक पातळीवरही चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होण्यावर चर्चा सुरु असताना. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (ameya khopkar) यांना संताप व्यक्त केला.

अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत विरोध दर्शवला आहे. ‘फवाद खानचा द लेजंड ऑफ मौला जट्ट हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असे अमेय म्हणाले. 

पुढे अमेय खोपकर यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यावेळी ते म्हणाले, ‘नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.’ (mns ameya khopkar is against theater release of the legend of maula jatt in india calls fans of fawad khan as traitors) 

हेही वाचा : Ram Gopal Varma चं चाललंय काय? आधी अभिनेत्रीच्या पायाला Kiss, आता अप्सरा राणीसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल

दरम्यान, फवाद खानचा ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटानं 200 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा हा पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे. हा लवकरच भारतातही प्रदर्शित होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. 23 डिसेंबर रोजी हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचं म्हटले जात होते. 

रणबीरकडून चित्रपटाचं कौतुक 

दुबईच्या जेद्दाह येथे सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहेत. यावेळी अभिनेता रणबीर कपूरनं देखील हजेरी लावली असता त्यानं ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं असून पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करालया आवडेल असे म्हटले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *