Headlines

CHYD ला रिप्लेस करणार ‘ही’ मालिका; डोळ्यावर गॉगल लावत विहीरीवर पाणी भरणाऱ्या महिलांचा स्वॅग पाहिलात का?

[ad_1]

Zee Marathi New Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका या आजही घराघरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या अशाच एका प्रोमोनं झी मराठीच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शननंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठीवर अनेक नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या त्यांच्या या प्रोमोनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार, झी मराठीवर….’ या कॅप्शननं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

गेली 9 वर्षे ‘झी मराठी वाहिनी’वरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘चला हवा येऊ द्या’ आता काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. निलेश साबळे यांनी याची माहिती दिली होती. मध्येही ही मालिका काही काळासाठी बंद झाली होती. परंतु तेव्हा चला हवा येऊ द्याची संपुर्ण टीम परदेश दौऱ्यावर होती. त्यांचे हे सर्व एपिसोड्स शुट झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं सुरूवात केली होती. आता या मालिकेच्या जागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. 

2014 साली ऑगस्टमध्ये पहिल्यांदा चला हवा येऊ द्या ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र जोरात चर्चा होती. प्रियदर्शन जाधव, निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, मानसी नाईक, सागर कारंडे, भारत गणेशपुरे अशा हरहुन्नरी कलाकारांपासून या मालिकेची सुरूवात झाली होती. सुरूवातीच्या एपिसोडला प्रियदर्शन जाधव आणि मानसी नाईक होते परंतु त्यानंतर त्यांनी ही मालिका सोडली होती. परंतु त्यानंतर निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे हे चला हवा येऊ द्याचे फेस झाले. त्यांची क्रेझ ही गेल्या 9 वर्षांत कायमच आहे. 

हेही वाचा : Just Looking Like a WOW… व्हायरल करणारी ‘ही’ पंजाबी महिला आहे तरी कोण?

‘फू बाई फू’ सुरू असताना ‘लय भारी’ हा चित्रपट आला होता. निलेश साबळे यांनी स्वत:हून सांगितले होते की, रितेश देशमुख यांचा लय भारी हा सिनेमा आला होता. तेव्हा मराठी चित्रपट प्रमोट करण्यासाठी कोणता शो आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावेळी असा तरी कोणता शो नाही मग त्यातूनच ‘चला हवा येऊ द्या’ची संकल्पना विकसित झाली होती. आणि फू बाई फूचा एक एपिसोड लय भारी या चित्रपटासाठी प्रमोशन करण्यासाठी शूट झाला असं त्यांनी सांगितले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *