Headlines

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात ‘हा’ बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका

[ad_1]

Chhatrapati Sambhaji : स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाचा  इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर  उलगडणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार ते हळू हळू समोर येत असून आता औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार ते समोर आलं आहे. 

‘ब्योमकेश बक्षी’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘औरंगजेब हा एक क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि कपटी  होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता. रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ शकतील यामुळे त्यांना ही संधी  दिल्याचं’ दिग्दर्शक राकेश सुबेसिंह दुलगज सांगतात. 

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर सांगतात की, ‘मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे.  

रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार  ‘छत्रपती संभाजी’  चित्रपटात दिसणार आहेत. 

हेही वाचा : ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल! म्हणाला होता ‘अभिषेक हा…’

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. राकेश सुबेसिंह हे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या भेटीला येणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *